अल्पसंख्यांक धनगर समाजाची विधानसभा प्रतिनिधित्वाची मागणी : विधानसभा लढविण्याची तयारी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अल्पसंख्यांक धनगर समाजाची विधानसभा प्रतिनिधित्वाची मागणी : विधानसभा लढविण्याची तयारी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

जिल्ह्यातील धनगर समाज आगामी विधानसभा निवडणूक 2019 लढण्याच्या तयारीत असुन आतापर्यंतच्या सर्व पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाची सतत उपेक्षा केली असुन राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून धनगर समाजाला जाणीवपुर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक दृष्ट्या मागासलेला हा समाज चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असुन त्यातल्यात्यात वरोरा, राजुरा, चिमुर, व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रांत प्रेत्येकी 10000च्या आसपास मतदान आहे.


मागिल विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाने आपले अस्तित्व जोरकसपणे सिध्द केले असुन जिल्ह्यातील वरोरा आणि राजुरा विधानसभा क्षेत्रात धनगर समाजाची मते निर्णायक ठरलेली सर्वांनी अनुभवले आहेच त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाला पुरेसे आणि सन्मानजनक प्रतिनिधित्व मिळाले नही तर धनगर समाज एकजुटीने किमान 5 विधानसभा क्षेत्रात आपले उमेदवार देणार असुन त्यांना विजयी करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील धनगर समाजाच्या सर्व लोकांनी ठेवले आहे. असे धनगर समाजातील नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

ह्यावेळी समाजातील डॉ. यशवंत कन्नमवार, साईनाथ बच्चे, कैलास उराडे, महेश देवकाते, डॉ. तुषार मरल्लावार, विठ्ठल येवले, विजय कोरेवार, रूपेश चिडे, विजय ढवळे, प्रविण गिलबिले, रामकुमार आकेपल्ली, शंकर बोंकुर, अतुल मंदे, निलेश काळे, संदिप शेरकी, गजानन शेरकी, हेमंत ढोले, अनुप पाल व महिला कार्यकर्त्यांसह इतर अनेक समाजबांधवांनी निवेदनात केले आहे.