राज्य शासनाच्या हिंस्त्रत्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी शेतमजूर यांचे होणारे नुकसानीकरीता अर्थसहाय्य निश्चिती समिती वर ऍड.पारोमिता गोस्वामी यांची निवड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राज्य शासनाच्या हिंस्त्रत्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी शेतमजूर यांचे होणारे नुकसानीकरीता अर्थसहाय्य निश्चिती समिती वर ऍड.पारोमिता गोस्वामी यांची निवड

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
हिंस्त्रत्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी शेतमजूर यांचे होणारे नुकसानीकरीता अर्थसहाय्य निश्चित करण्यासाठी शासनाने गठीत केलेल्या समितीचे अशासकीय सदस्य म्हणून अॅड.  पारोमिता गोस्वामी यांचा समावेश केलेला आहे. तसे परिपत्रक राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने 17 सप्टेंबर रोजी निर्गमित केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांमुळे शेतकरी व शेतमजुरांची प्रचंड नुकसान होते आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी एडवोकेट पारोमिता गोस्वामी हे सातत्याने प्रयत्न करत आहेत.  मोर्चे आंदोलन या माध्यमातून या प्रश्नांकडे शासनाचे त्यांनी लक्ष वेधले आहे.   

जंगलालगत राहणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांना व नागरिकांना न्याय देता यावा यासाठी श्रमिक एल्गार च्या माध्यमातून त्यांनी वन हक्क अभियान राबविले.  त्याद्वारे ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा येथे मोठी "मानव हक्क परिषद" घेऊन या प्रश्नाचे गांभीर्य शासनाकडे मांडले आहे.

ऍड. पारोमिता गोस्वामी यांचा या प्रश्नावरील अभ्यास व केलेले कार्य लक्षात घेऊन, शासनाने समितीची पुनर्रचना करून ऍड. गोस्वामी यांना सदस्य म्हणून नेमले आहे.

या प्रश्नावर  गोस्वामी यांची बांधीलकी पाहता चंद्रपूर जिल्ह्यातील हिस्त्र वन्यप्राण्यांमुळे शेतकरी, शेतमजूर यांचे होणारे नुकसानी करिता  शासनाचे लोकोपयोगी धोरण तयार होईल असा विश्वास आहे.
जनसामान्यांच्या प्रत्येक प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा छडा लागतपर्यंत आपल्या ओजस्वी कार्यशक्तीने त्याचा पाठपुरावा करणाऱ्या या खऱ्या रणरागिणीचे टीम खबरकट्टा कडून हार्दिक अभिनंदन - गोमती पाचभाई, संस्थापक/संपादक -www.khabarkatta.com