नगराध्यक्षानी फडकविला उलटा तिरंगा ध्वज : रीतसर सलामीचाही विसर : नागरिकांची कारवाही ची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नगराध्यक्षानी फडकविला उलटा तिरंगा ध्वज : रीतसर सलामीचाही विसर : नागरिकांची कारवाही ची मागणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -गडचांदूर 
                             
आज दिनांक 17 सप्टेंबर चंद्रपूर जिल्ह्यातील  राजुरा, कोरपना, जिवती या तालुक्यांना निजामशाहीतून स्वतंत्र भारतात समाविष्ट करून घेतल्या दिनानिमित्य मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात गडचांदूर च्या नागराध्यक्षा  सौ.विजयालक्ष्मी दोहे यांनी चक्क उलटा तिरंगा फडकावून धवजरोहण करून वारंवार वादविवादाने सतत चर्चित असणाऱ्या,आपल्या निष्काळजी पणाचा उत्तम परिचय शहरातील नागरिकांना दिला.

आज नगर नगरपालिकेत मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमात नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे यांनी तिरंगा ध्वज उलटा लटकावीत ध्वजारोहण करून राष्ट्रगान गात सलामी सुद्धा दिली. हे सर्व आटोपल्यावर उपस्थित असलेले सतीश उपलांचीवार यांना तिरंगा उलटा फडकला असल्याचे लक्षात येताच ध्वज खाली उतरऊन सरळ काढून परत वर चढवून फडकविण्यात आला.

ही चूक जरी अनावधानाने झाली असेल तरीही चूक लक्षात आल्यानंतर तिरंगा सरळ काढून परत वर लावण्यात आला व त्यानंतर योग्य सन्मान  करत पुन्हा राष्ट्रगीत घेऊन सलामी देणे आवश्यक असूनही असे काहीही न करता राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आला असून  या अपमानजनक कृत्याचा आम्ही निषेध करतो- सचिन भोयर, युवासेना जिल्हाप्रमुख व नगरसेवक 
करिता नगराध्यक्षावर निष्काळजीपणा व अपमानजनक वागणुकीचा ठपका ठेऊन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपा शहर प्रमुख सतीश उपलंनचीवार, युवासेना जिल्हा प्रमुख सचिन भोयर, राकेश अरोरा, रामसेवक मोरे, मंगेश घरोटे, रोशन काकडे, संदीप शेरकी व शहरातील नागरिकांनी ठाणेदार गोपाल भारती यांना लेखी तक्रार देऊन केली आहे.