कुंभेझरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड : लहुजी गोतावळे यांची निवड - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कुंभेझरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड : लहुजी गोतावळे यांची निवड

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :संतोष इंद्राळे -जिवती : 

विधान सभेच्या निवडणुकी पूर्वी झालेल्या जिवती तालुक्यातील कुंभेझरी ग्रामपंचायतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.


जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता, आज कुंभेझरी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पडली, त्यामध्ये " आदर्श ग्राम विकास आघाडीचे " मा.श्री.लहुजी अर्जुनराव गोतावळे यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली. 

तसेच थेट जनतेतून सरपंच पदाची निवड  पहिल्यांदाच झाली असून याच पॅनलच्या सौ.कमलताई अंबादास जाधव यांची निवड पूर्वीच झाली आहे.तर सदस्य म्हणून श्री.रवी जेवाले, श्री.संतोष पवार, सौ.मुद्रिका कांबळे, सौ.सविता वाघमारे, सौ.छाया जीवतोडे, सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले.