स्मार्ट ग्राम बिबी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

स्मार्ट ग्राम बिबी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर -  सुरज लंडांगे, बीबी              
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील ओवीप्रमाणे गाव हा विश्वाचा मूळ घटक असून गावावरून देशाची परीक्षा ठरत असते. बीबी वं महाराजांच्या साहित्य व  विचारांनी प्रेरित झालेलं जिल्हयातील आदर्श गाव. 

गावातील तरुणाईच्या मनात समाजपरिवर्तनाची तळमळ कायमस्वरूपी दिसत असून, वं महाराजांच्या विचारांचा वारसा गावात तेवत राहावा, याकरिता राष्ट्रसंत युवा मंडळ यांच्या पुढाकाराने व गावातील लोकसहभागातून गावाच्या दर्शनीयस्थळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारून नुकतेच 12 सप्टेंबर 2019 रोजी  अनावरण सोहळा संपन्न झाला.
गाव हा विश्वाचा नकाशा। गावावरूनि देशाची परीक्षा।।
 गावची भंगता अवदशा। येईल देशा।। 
ग्रामगीता
            
सदर सोहळ्याला उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते मा.डॉ.सचिनजी मेश्राम तर सहउद्घाटक म्हणून समाजसेवक डॉ. गिरीधरजी काळे, अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती मा.साईनाथजी कुडमेथे  होते. 

विशेष अतिथी  ह.भ.प. विठ्ठल डाखरे महाराज, अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे मा.सोपान नागरगोजे, गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव मा. बापूजी पा. पिंपळकर, उपसरपंच प्रा.अशिषजी देरकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा. शंकररावजी  आस्वले, पोलीस पाटील मा.राहुलजी आसुटकर, राष्ट्रसंत युवा मंडळाचे अध्यक्ष मा.निवृत्ती ढवस होते. 

तर प्रमुख पाहुणे  म्हणून आनंदराव पा.पावडे, नामदेव पा.ढवस, पांडुरंग पा.लेडांगे होते उपस्थित होते  संचालन विठ्ठल टोंगे यांनी तर प्रास्ताविक श्यामकांत पिंपळकर व आभार ह.भ.प.विठ्ठल डाखरे महाराज यांनी मानले. सोहळ्याचे साक्षीदार म्हणून समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.