जुन्या पेन्शनसाठी व कर्मचार्यांच्या मागण्यासाठी निघालेल्या मोर्चाला राजू झोडे यांचा जाहीर पांठीबा व समर्थन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जुन्या पेन्शनसाठी व कर्मचार्यांच्या मागण्यासाठी निघालेल्या मोर्चाला राजू झोडे यांचा जाहीर पांठीबा व समर्थन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांच्या  निघालेल्या जुन्या पेन्शन योजनेच्या व कर्मचार्यांच्या विविध समस्याबाबत चंद्रपूरात निघालेल्या विराट मोर्चाला उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे यांनी जाहीर पाठिंबा व समर्थन दिले.

      
शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांना 1 नोहेंबर 2005 नंतर नौकरीवर लागलेल्यांना जुनी पेन्शन योजना बंद करुन अन्यायकारक अंशदाय पेन्शन योजना सरु केली. यामुळे 2005 नंतर नौकरीवर लागलेल्यांना व त्यांच्या कुटुंबाना कोणत्याही प्रकारची सुरक्षीतता राहिली नाही.

त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागु झाली पाहीजे तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांच्या विविध मागण्यांना घेऊन चंद्रपूरात जिल्हाधिकार्यालयावर हजारोच्या संख्येनी शासनाच्या विरोधात मोर्चा निघाला. सदर मांगण्या ह्या रास्त असुन कर्मचार्यांच्या जुन्या पेन्शन योजनेला लवकरात लवकर मान्यता द्यावी व कर्मचार्यांच्या सर्व मागण्या शासनाने मंजुर कराव्या करिता उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजुभाऊ झोडे यांनी जाहीर पाठींबा देऊन मोर्चास समर्थन दिले.