एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर तर्फे महिलांची आरोग्य तपासणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर तर्फे महिलांची आरोग्य तपासणी

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गडचांदूर -

दिनांक 14/09/2019 ला अंगणवाडी केंद्र ,वॉर्ड नं.6 गडचांदूर ता. कोरपना  येथे एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र, ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर ता. कोरपना जि. चंद्रपूर व प्राथमिक आरोग्य केंद्र, नारंडा  यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण अभियान कार्यक्रमा निमित्याने एच.आय. व्ही.,ब्लडप्रेशर , शुगर तपासणी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. 


तसेच  पोषक आहाराचे महत्व, योग्य आहार कसा घ्यायचा, पुरेसा व्यायाम, कुटुंब नियोजन , एच.आय. व्ही./एड्स, क्षयरोग, गुप्तरोग यावर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी समुपदेशिका आस्मा पठाण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शिल्पा साळवे, प्राथमिक आरोग्य केंद्र, नारंडा चे ए.एन.एम. श्रीमती यशोदा राठोड  व अंगणवाडी सेविका यांची उपस्थिति होती. शिबिरात एकूण 50 जनांचे समुपदेशन  करुन 20 व्यक्तींची एच.आय. व्ही.तपासणी व 42 व्यक्तींचे ब्लूडप्रेशर, शुगर तपासणी करण्यात आली .