आता गाढव करणार राजुरा बल्लारपूर रेल्वे फाटकावरील उडाणपूलाचे काम पूर्ण : - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आता गाढव करणार राजुरा बल्लारपूर रेल्वे फाटकावरील उडाणपूलाचे काम पूर्ण :

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -राजुरा :

मागील 11 वर्षा पासुन अपुर्ण असलेल्या राजुरा-बल्लारपूर मार्गावरील रेल्वे फाटक उड्डाणपुचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी धरून स्वयंघोषित विदर्भवीर बाबाराव मस्की व त्यांच्या पत्नी सौ. शोभा मस्की यांनी आंदोलन छेडले आहे.

या आंदोलनाकडे जनतेचे लक्ष वेधण्याकरिता अनोखी शक्कल लढवीत आज बाबाराव मस्की हे प्रथम श्रेणी सहाय्यक अभियंता कार्यालयात गाढव घेऊन गेले असुन अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे त्यांनी कार्यालयात ठिय्या मांडला आहे.

कमीतकमी रुग्णवाहिका, दुचाकी आणि हलक्या वाहनांना प्रवासासाठी तत्काळ उड्डाणपूल सुरू करण्यात यावा ह्या मागणीसाठी तसेच मागणी पुर्ण होईपर्यंत कार्यालयात गाढवासह ठिय्या देणार असल्याचे बाबाराव मस्की ह्यांनी सांगितले.

सहाय्यक अभियंता आकाश बाजारे ह्यांच्याशी संपर्क केला असता ते कार्यालयीन कामासाठी चंद्रपूरला गेले असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर बाबाराव मस्की ह्यांनी आजच्यासाठी आंदोलन स्थगित केले असुन येत्या आठवड्यात पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही तर अजुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजुरा विधानसभा निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवार म्हणून जनतेचे लक्ष वेधू पाहणाऱ्या मस्की दाम्पत्यांनी दिला आहे.