श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे पूरग्रस्तांना सहाय्यता निधीसाठी फेरी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे पूरग्रस्तांना सहाय्यता निधीसाठी फेरी

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : राजुरा-

श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीसाठी सहाय्यता निधी गोळा करण्यासाठी राजुरा शहरात सहाय्यता फेरी काढण्यात आली. माणुसकीच्या नात्यातून पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन रासेयो च्या स्वयंसेवकानी जनतेला तसेच व्यापारी वर्गाला करण्यात आले या आवाहनाला राजुरा शहरातील व्यापारी वर्ग तसेच नागरिकांनी प्रतिसाद देत जीवनावश्यक वस्तू, रोख रक्कमेच्या स्वरूपात भरभरून मदत केली.


या फेरीमधून पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू, तसेच रोख रकम अश्या स्वरूपात ही मदत स्वीकारल्या गेली.  या फेरीमधून जमा झालेली मदत राशी व वस्तू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे सन्माननीय कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. नरेश मडावी यांचे कडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ईश्वर मोहूर्ले, डॉ. चंद्रमौली, डॉ. राजेंद्र मुद्दमवार,डॉ विजया गेडाम, प्रा. गुरुदास बल्की उपस्थित होते.

पूरग्रस्तांना सहाय्यता निधी साठी काढलेल्या  फेरीसाठी आ.शि.प्र.म. संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की, डॉ. सारिका साबळे यांच्यासह संपूर्ण प्राध्यापक वृंदानी, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली. तसेच रासेयो पथकाच्या स्वयंसेवकानी अधिक मदत घेऊन फेरी यशस्वी पार पाडली.