दारू पिण्यास पैसे नं दिल्याने युवकाने घेतला चक्क गळफास - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दारू पिण्यास पैसे नं दिल्याने युवकाने घेतला चक्क गळफास

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर प्रतिनिधी -

शहरातील किल्ला वॉर्ड येथील रहिवासी युवक  रवी महाकाली गडपवार(वय -30)याने दारू पिण्याकरिता पैसे देण्यास नकार दिल्याकारणाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. 

मृतक रवी याला दारूचे व्यसन होते व दिवसभर काम करून मिळालेले पैसे दररोज दारू मध्ये खर्च करायचा. कधी पैसे कमी पडल्यास घरच्यांना आणखी पैसे मागायचा, आणि त्यांनी देण्यास नकार दिलातर आपल्या घरच्या परिवारा सोबत भांडण नित्येनेमाचेच झाले होते असे त्याचे कुटुंबीय व शेजाऱ्यांनी बयाणात सांगितले आहे.

आज दि,21 सप्टेंबर 2019 रोज शनिवार ला रवी कामा वरून जेवण करण्या करिता घरी आला आणि दारू पिण्या करिता आपल्या वृद्ध आई ला पैश्याची मागणी केली.वृद्ध आई जवळ पैसे नसल्याने पैसे नाही दिले,या कारणाने आईला मारण्याची धमकी देऊ लागला आणि आई ला घरा बाहेर काढले आणि दार बंद करून दुपट्टा ने घराचा छताला लटकून गळफास लावून आत्महत्या केली.

ही घटना सायंकाळी 5च्या सुमारास घडली, बल्लारपूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदणाकरिता पाठविण्यात आले.