महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक - शिक्षकेत्तर समन्वय समिती जिल्हा चंद्रपूर यांच्या तर्फे जिवती तहसिलदारांना निवेदन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक - शिक्षकेत्तर समन्वय समिती जिल्हा चंद्रपूर यांच्या तर्फे जिवती तहसिलदारांना निवेदन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :संतोष इंद्राळे -जिवती 

कर्मचाऱ्यांच्या अनेक न्याय मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानेच महाराष्ट्र तिल शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वज्रमुठ तयार करण्यात आली आहे.अंशदायी पेंशन योजना ही कुटुंबव्यवस्था उध्वस्त करणारी योजना गेली 14 वर्ष राज्यातील कर्मचारी प्राणपणाने मांडत आहेत.

यासह खालील मागण्यांवर कर्मचाऱ्यांच्या प्रती जिव्हाळ्याचा व न्यायिक असून यापूर्ण करण्यासाठी राज्यातील कर्मचारी एकवटला आहे,यातच खालील प्रमाणे आंदोलनाची दिशा राज्य समन्वय समितीने निर्देशित करून जागोजागी शासनाला निवेदने देऊन मागन्या सरकारपर्यंत पाहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक - शिक्षकेत्तर समन्वय समिती जिल्हा चंद्रपूर यांच्या तर्फे जिवती तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.


निवेदनातील प्रमुख मागण्या :- 
1) जुनी पेंशन योजना लागू करणे
2) सर्व संवर्गातील वेतनत्रुटी दूर कराव्या.
3) खाजगी करण, कंत्राटी करण धोरण रद्द करून राज्यातील सर्व कार्यालयात कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे
4) केंद्रा प्रमाणे सर्व भत्ते मिळावेत 
5) लिपिक व लेखा लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान पदनाम,समान काम,समान वेतन,व समान पदोनत्तीचे टप्पे करावे
6) अनुकंपा भरती तात्काळ व विनाअट करावी
7) सर्व कर्मचाऱ्यांची अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढण्यात यावी
8) शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये
9) आरोग्य विभागातील कामाचे तास निश्चित होई पर्यंत बायोमेट्रीक प्रणाली आणू नये

या मागण्यांची पूर्तता न झाल्यास किंवा शासनाकडून मागण्यांच्या दिशेने कोणतेही ठोस पाऊले उचलण्यात न आल्यास समितीने आंदोलनाचा खालील इशारा दिला आहे.
1) 5 सप्टेंबर पासून काळ्याफिती लावून निषेध नोंदवतील 
2) 9 सप्टेंबर एक दिवसीय लाक्षणिक संप
3) जर याकडे दूर्लक्ष केल्यास 11 सप्टेंबर पासून राज्य सरकारी सर्वच कर्मचारी बेमुदत संपावर जातील व उधभवणाऱ्या परिस्थितीला शासन सर्वस्वी जबाबदार राहील.

राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी व शिक्षक  शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांवर सकारात्मक विचार करावा यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे तालुका अध्यक्ष मा.सि.व्ही.रोकडे,अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका सचिव मा.पी.एन.पवार तसेच महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तालुका अध्यक्ष मा.सुनील बी जाधव व केंद्रसंघटक प्रफुल्ल चिवाने,योगराज बोरकुटे, बाळकृष्ण गावंडे, व इतर संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हे निवेदन मा.गजभिये तहसिलदार जिवती यांच्यामार्फत महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणविस यांना पाठविण्यात आले.