चंद्रपूर जिल्ह्यातील बाबुपेठ ,राजुरा वर्धा नदिवरिल पुल व रेल्वे ओवर ब्रिज या सर्व पुलाचे बांधकाम त्वरित पुर्ण करा :- राजु झोडे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर जिल्ह्यातील बाबुपेठ ,राजुरा वर्धा नदिवरिल पुल व रेल्वे ओवर ब्रिज या सर्व पुलाचे बांधकाम त्वरित पुर्ण करा :- राजु झोडे

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :


चंद्रपूर येथिल बाबुपेठ रेल्वे क्रांसिग वरिल पुल तसेच राजुरा जवळील वर्धा नदिवरील पुल व राजुरा येथिल रेल्वे ओवर ब्रिज या सर्व पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करण्याची मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे यांनी केली.

     
राजुरा येथिल रेल्वे क्रांसिगवर मागिल दहा वर्षापासुन रेल्वे ओवर ब्रिजचे काम फार संथगतीने सुरु असुन या पुलाचे बांधकाम अजुनही पुर्ण झाले नसल्याने त्या रोडवर मिनिटाला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असुन सदर पुलाचे तिन तेरा वाजले आहे. त्यामुळे या परिसरातील जनतेला नाहक त्रासाला समोरे जावे लागत आहे. तसेच राजुरा ते बल्लारपूर मार्गावरिल ब्रिटीश कालिन पुल हा पुर्ण जिर्णअवस्थेत असुन पुलाच्या बाजुला कठडे नसल्याने प्रवाशी जिव धोक्यात टाकुन प्रवास करत आहेत. नुकताच या पुलावर एक जोडपे वाहुन गेले परंतु सुदैवाने त्यांचा जिव वाचला.


कोणत्याही क्षणी हा पुल कोसळण्याची शक्यता असुन मोठा घातपात घडु शकतो. त्यामुळे सदर दोन्ही पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे. तसेच बाबुपेठ रेल्वे क्रांसिगवरिल पुलाचे बांधकामही संथगतीने होत असुन त्यामुळे या परिसरातील जनतेला मोठ्या त्रासाला समोर जावे लागत आहे. सदर जिल्ह्यातील हे तिनही पुलाचे बांधकाम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली. जर लवकरात लवकर या पुलांचे बांधकाम करण्यात आले नाही तर याविरोधात उग्र आंदोलन करण्याचा ईशारा राजु झोडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला.

  
सदर समस्या बाबतीत निवेदन देतांना राजु झोडे ,संपत कोरडे,गुरु कामटे,ठप्पा निषाद,नागेश रत्नपारखी,पंचशिल तामगाडगे,बंटी खोब्रागडे,संस्कार सुखदेवे तथा अन्य कार्यकर्त्यांनी दिले.