सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व परिचारीकांच्या हलगर्जीमुळे भावाचा मृत्यू : उद्विग्न बहिणीची पत्रकार परिषद - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व परिचारीकांच्या हलगर्जीमुळे भावाचा मृत्यू : उद्विग्न बहिणीची पत्रकार परिषद

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर –
18 वर्षीय लहान भावाचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला, डॉक्टर व परिचारिका यांना निलंबित करा अशी मागणी आज आयोजित पत्रकार परिषदेत दीक्षा वाकुडकर यांनी केली.

रितीक मारोती वाकुडकर याला सिकलसेलचा आजार होता 7 सप्टेंबरला आजारी अवस्थेत असतांना त्याला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, सिकलसेलच्या रुग्णावर ज्याप्रमाणे उपचार करायला हवं होतं तसा उपचार झाला नाही, उलट त्याला ओआरएस देण्यात आले.
9 सप्टेंबरला लहान भाऊ रितीकची तब्येत खालावली, त्याच्या ओठांचा भाग सुद्धा बधिर झाला होता,  याबाबत डॉक्टर यांना सांगितल्यावर पण त्यांनी यावर लक्ष दिले नाही, रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध असताना पण माझ्या आईला बाहेरून आणण्यास सांगितले, जेव्हा सिकलसेल च्या रुग्णावर पूर्णपणे मोफत उपचार होतो असे असताना पण त्याला लागणारे औषध पण बाहेरून आणण्यास सांगितले.

व्हेंटिलेटर ची गरज असताना पण आमच्याकडे व्हेंटिलेटर नाही तुम्ही खाजगी रुग्णालयात जा असा सल्ला डॉक्टरांनी दिला, यानंतर माझ्या भावाला खाजगी रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शासकीय रुग्णालयात साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून तेथील परिचारिका त्यांना रुग्णांची सलाईन बदलायला लावतात, असे हाल रुग्णालयाचे आहे, रुग्णाच्या आरोग्य व जीवाशी खेळ परिचारिका करीत असतात. माझ्या भावाच्या मृत्यूस कारणीभूत शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका यांची चौकशी करून निलंबित करावे अशी मागणी मृतक रितीकच्या बहिणीने पत्रकार परिषदेत केली.