कोरपना येथे किटकनाशक फवारणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरपना येथे किटकनाशक फवारणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना प्रतिनिधि-  
कोरपना तालुका कृषी अधिकारी कार्यालय, व पंचायत समिती कृषी विभागाच्या माध्यमाने आज तहसिल कार्यालय सभागृहात ‘कीटकनाशक फवारणी करतेवेळी घ्यावयाची काळजी’ यावर कार्यशाळा घेण्यात आली. तसेच फेरोमोन ट्रॅप ल्यूरचे वितरण हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पचांयत समितीचे सभापती श्याम रणदिवे होते. शेतकरी बांधवांनी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. विषबाधा झाल्यास त्याची लक्षणे ओळखून तातडीने उपचार करावा. तसेच वाटप करण्यात आलेल्या फेरोमोन ट्रॅप ल्यूरचा नियोजनबद्ध वापर करावा -धामले साहेब, तालुका कृषी अधीकारी 

तर पंचायत समितीचे उपसभापती सभाजी कोवे  यांनी कार्यक्रमाचे उद्‍घाटन केले. जिल्हा कृषी अधिकारी लक्ष्मी नारायण दांडगे, उपविभागीय कृषी अधिकारी राजुरा गोविंद मोरे, तालुका कृषी अधिकारी कोरपना धमाले, कृषी विज्ञान, केन्द्र सिन्देवाही चे.कृषी समन्वयक डॉ. विनोद नागदेवते आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

पहिल्या सत्रात पाटील यांनी कापूस सोयाबीन पिकावरील कीड-रोगाची ओळख करणे. त्यावरील उपाययोजना कशी करावी, याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी राजुरा गोविंद मोरे. जिल्हा कृषी अधिकारी दोडके डॉ. नागदेवते शास्त्रज्ञ प.स.सहाय्यक गाविअ बैलमवार यांच्या हस्ते उपस्थित शेतकरी बांधवांना फेरोमोन ट्रॅप ल्यूरचे वितरण करण्यात आले. हे साहित्य शेतकरी बांधवाच्या पिकवाढीसाठी कसे उपयुक्त ठरते याबाबतची विस्तृत माहिती देण्यात आली.तसेच बिबी येथील प्रगतशील शेतकरी हबिब शेख यांचा पंचायत समिती चे सभापती श्यामभाऊ रणदिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


जिल्हा कृषिअधिकारी  लक्ष्मी नारायण दोडके यांनी फवारणी करताना विषबाधा झाल्यास त्याची लक्षणे कशी ओळखायची व त्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यासाठी काय करावे. या संदर्भात मार्गदर्शन केले. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी बांधंवाना सेप्टी किट देण्यात आल्या. 

संचालन पंचायत समितीचे कृषी अधिकारी विवेक दुधे यांनी केले. विविध विषयांवर  घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.