"धानोरकरांना काँग्रेस च्या गोष्टी माहित नसल्याच्या" पक्ष प्रवक्ते राजू वाघमारेंच्या विधानाने खडबड : प्रतिभा धानोरकरांच्या उमेदवारी वरून संभ्रम - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"धानोरकरांना काँग्रेस च्या गोष्टी माहित नसल्याच्या" पक्ष प्रवक्ते राजू वाघमारेंच्या विधानाने खडबड : प्रतिभा धानोरकरांच्या उमेदवारी वरून संभ्रम

Share This
प्रस्तावित यादीवरून काँग्रेस चे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी घेतला धानोरकरांचा समाचार : जी यादी सोशल मीडिया वर फिरत आहे ती 11 सप्टेंबर 2019 ची प्रस्तावित यादी असू शकते व अधिकृत घोषणा होईपर्यंत त्यात फेरबदलही होऊ शकतात.असे असताना काही जण चुकीची यादी वायरल करून तीच खरी असल्याचा आव आणीत आहेत - राजू वाघमारे, प्रवक्ता, महाराष्ट्र काँग्रेस.

खबरकट्टा / चंद्रपूर :
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी सर्व पक्षांप्रमाणे काँग्रेस मधेही अनेकजण इच्छुक आहे.  तसेच काही विशिष्ट ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने नवउमेदवारांची  चाचपणी सुरू आहे. अद्यापही कुठलीही अधिकृतपणे यादी जाहीर झाली नाही.

विशेष म्हणजे, खासदार बाळू धानोरकर हे हीच यादी फायनल असल्याचे सांगत असल्याने इच्छुकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र सदर यादी खोटी असून बाळू धानोरकर यांनी केलेले व्यक्तव्य अनवधानाने असल्याचे सांगून काँग्रेसच्या काही गोष्टी त्यांना माहीत नसल्याचे काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी म्हटले आहे.

विधानसभेसाठी काही जण आपल्याना उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावून आहे. त्यातच प्रस्तावित यादी वायरल करुन मतदारांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न काहींनकडून केला जात आहे. या वायरल यादीला खासदार धानोरकर अंतिम यादी असल्याचे व्यक्तव्य करून कॉंग्रेसच्या ध्येयधोरणाला बगल देत असल्याचे वाघमारे यांच्या विधानाने स्पष्ट होत असल्याचे जनमानसात बोलल्या जात आहे.

विशेष म्हणजे, वरोरा विधानसभा निवडणुकीत खासदार धानोरकर आपल्या पत्नीला उमेदवारी मागत असून या उमेदवारीला काँग्रेसच्या काही जणांकडून प्रखर विरोध आहे. त्यातच एकाच घरातील दोघे नको म्हणून मतदार तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचेही मत आहे.  मात्र प्रस्तावित यादीत अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच पत्नीचे नाव असल्याचे सांगत प्रचार घाई सुरु करण्याचे कारण असावेत अशी कुजबुज मतदारांत आहे.