जामतुकूम येथील इसमाचे शव आढळले बेवारस स्थितीत : घातापाची शक्यता - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जामतुकूम येथील इसमाचे शव आढळले बेवारस स्थितीत : घातापाची शक्यता

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : पोंभुर्णा-मूल प्रतिनिधी -
जामतुकुम येथील रमेश आकेमवार यांचा शव जानाळा येथे बेवारस स्थितीत अाढळुन आले.
सविस्तर वृत्त असे कि जानाळा येथील बसस्थानक मुख्य मार्गावर असून  सतत प्रवाशांची वर्दळ सुरू असते अशातच एक प्रवाशी लघुशंकेसाठी बसस्थानकाच्या मागील बाजुस गेला असता त्याला दुर्गंधी अाल्याने त्यानी हि बाब नागरीकांच्या लक्षात अानुण दिली तेव्हा जानाळा गावातील पोलीस पाटील सौ.कुमरे ताई यांनी मूल पोलीसांना भ्रमनध्वनी वरून पाचारन केले मूल पोलीसांचा ताफा लगेच घटणास्थळी दाखल झाला.

पोलीसांनी चौकशी केली असता सदर इसम जामतुकुम येथील रमेश आकेमवार असल्याचे समझले पोलीसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालय मुल इथे पाठविले असुन मृत्युचे कारण अजून समझले नाहि घटनेचा पुढील तपास मुल पोलीस करित अाहेत