अट्टल मोबाईल चोराच्या धरपकडीत सापडल्या चांदीच्या माळा : रामनगर पोलिसांची कारवाही - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अट्टल मोबाईल चोराच्या धरपकडीत सापडल्या चांदीच्या माळा : रामनगर पोलिसांची कारवाही

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -शहर प्रतिनिधी :

शहरात पुन्हा अट्टल चोरांना रामनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने शिताफीने पकडून चोरांच्या मुसक्या आवळल्या आहे. काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या चांदीच्या माळा आणि मोबाईल, चोराकडून हस्तगत करून डीबी स्कॉडचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष दरेकर यांनी पोलीस निरीक्षक हाके यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कामगिरी केली आहे.

शहरातील बंगाली कैम्प परिसरातील प्रकाश हलदर आणि राजेश पंजा या दोन आरोपीकडून 155000/-रुपयाचा मुद्देमाल जब्त करण्यांत आला.

एकीकडे अवैध दारु विक्रेत्यांना पकडण्यासाठी पोलिसांत मोठी सर्कस करावी लागत असल्याने भुरटे व अट्टल चोराकडे दुर्लक्ष होतं आहे.परंतु रामनगर पोलीस स्टेशन क्षेत्रात होणाऱ्या गुन्ह्यात आरोपी लवकर पकडल्या जातं असल्याने अवैध धंदेवाईक व चोरांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईत प्रभूदास माऊलीकर, आनंद परचाके, रजनीकांत पुठ्ठावार, सुधीर पाटिल, शंकर येरणे, नीलेश मुडे, माजिद पठाण, भावना रामटेके इत्यादींनीं परिश्रम घेतले.