मूळनिवासी एकता संघर्ष समिती जिवती तर्फे तहसीलदार यांना अमृता पिल्लेवाड ची पदावरून हकालपट्टी करण्या साठी निवेदन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मूळनिवासी एकता संघर्ष समिती जिवती तर्फे तहसीलदार यांना अमृता पिल्लेवाड ची पदावरून हकालपट्टी करण्या साठी निवेदन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


संतोष इंद्राळे जिवती :- जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत खडकी (रायपूर) हे गाव पेसा अंतर्गत असून येथील सरपंच पद अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता राखीव आहे.येथील सरपंच पदावर सौ.अमृतवर्षा बालाजी पिल्लेवाड निवडुन आल्या व विराजमान आहेत,त्यांनी महादेव कोळी या जातीचे अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र बोगस व बनावट कागदत्राद्वारे काढल्याची तक्रार श्री.आरिफ शेख यांनी मा.उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्याकडे दिली होती.मा.उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी तहसीलदार जिवती कडून चौकशी अहवाल मागितल्यावर तहसीलदार जिवती यांनी अहवाल सादर केला,त्यानुसार सौ.अमृतवर्षा पिल्लेवाड यांना बनावट व बोगस कागदपत्राद्वारे जात प्रमाणपत्र काढल्याचे सिद्ध झाले.

त्याचबरोबर पाटण येथे  भादवी कलम ४२०,४६८,४७१ अन्वये गुन्हा नोंद झाला आहे.सरपंच पदावर निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधत प्रमाणपत्र करणे कायद्यान्वये बंधनकारक असतांनाही त्यांनी दोन वर्षांचा कालावधी लोटूनही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही.जात प्रमाणपत्र बोगस असल्याने त्यांनी जात वैधता तपासणी समितीकडे प्रस्तावच सादर केला नाही, बोगस व बनावट कागदपत्राच्या आधारे जात प्रमाणपत्र काढल्यामुळे सौ.अमृतवर्षा बालाजी पिल्लेवाड यांचेवर ४२० चा गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांना खडकी (हिरापूर) येथील सरपंच पदावरून निष्काशीत करण्यात यावे,म्हणून मूळनिवासी एकता संघर्ष समितीचे अध्यक्ष मा.प्रा.लक्ष्मण मंगाम, मा.सोमजी सिडाम उपाध्यक्ष, मा सीताराम मडावी सचिव, मा.हनुमंत कुंभरे सरपंच येसापूर,मा.भिमराव मेश्राम माजी सभापती प.स.जिवती मा.संजय मडावी मा.देवराव सिडाम मा.वासुदेव गेडाम मा.भिमराव कुंभरे मा.बी.बी.कोरवाते यांच्या उपस्थितीत तहसीलदार जिवती यांना हे निवेदन देण्यात आले.