चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रात अडोरे कान्ट्रँक्टर प्रा.लि. कंपनीचा प्रताप कामगारांना विनाकारण कामावरुन काढले : कामवार न घेतल्यास राजू झोडे यांचा आंदोलनाचा इशारा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रात अडोरे कान्ट्रँक्टर प्रा.लि. कंपनीचा प्रताप कामगारांना विनाकारण कामावरुन काढले : कामवार न घेतल्यास राजू झोडे यांचा आंदोलनाचा इशारा

Share This
-कत्रांटदाराकडुन कामगारांची पिळवणुक सहन करणार नाही :-राजु झोडे

खबरकट्टा / चंद्रपूर -
चंद्रपूर औष्णिक वीजकेंद्रातील दुर्गापूर पाँवर प्लँट अंतर्गत अडोरे प्रा.लि.कंपनी मधिल कामगार राजु मसाळकर ,आकाश उघडे व भावना कंपनीमधिल कामगार डोमा घोटेकर,योगेश नरखेडे हे कामगार बरेच वर्षापासुन वरिल दोन्ही कंपनी मधे काम करत होते. 

परंतु वरिल कामगारांनी युनिअन चे सदस्य झाले असे जेव्हा कंपनीला कळाले तेव्हा कंपनीने एकाएकी कोणतीही पुर्वसुचना न देता कामावरुन काढुन टाकले. त्याबद्दल दि.20 आगष्ट 2019 ला कामगार कल्याण अधिकारी सिटीपीएस यांची बैठक घेतली. 

परंतु त्यानी सुद्धा तुम्ही कामगार युनियन सोडुन द्या त्यानंतरच तुम्हाला कंपनी कामावर घेईल असे सांगितले. कामगार कल्याण अधिकार्यांनी कंपनीला तुम्ही कामगारांना का बंद केले असा साधा प्रश्नही विचारला नाही. यावरुन कंपनी व अधिकारी यांची मिलिभगत असल्याचे दिसुन येते. असा आरोप राजु झोडे यांनी  केला. या गोष्टीमुळे कामगारांची मोठी पिळवणुक होत असुन कामगारांवरचा अन्याय या दोषी ठेकेदार व अधिकार्यांमुळे वाढत आहे. 
       
जर वरिल कामगारांना लवकरात लवकर कामावर घेतले नाही तर उलगुलान कामगार संघटेकडुन कामगारांवरच्या होणार्या अन्यायाविरोधात वीज केंद्रावर तिव्र आंदोलन करेल व त्यादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार शासन व प्रशासन राहणार असा ईशारा राजु झोडे यांनी निवेदन देऊन व पत्रकार परिषद घेऊन दिला.
      
सदर पत्रकारपरिषदेत राजु झोडे,रविभाऊ पवार ,गुरु भगत, डोमा घोटेकर,राजु मसाळकर,आकाश उघडे,योगेश नरखेडे तसेच अन्य उलगुलान कामगार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.