ब्रेकींग न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक दीपक जयस्वाल यांना अवैध दारू तस्करीत रंगेहाथ अटक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकींग न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक दीपक जयस्वाल यांना अवैध दारू तस्करीत रंगेहाथ अटक

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 
थोडक्यात बातमी : 3:35 (दुपारी )

राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक दीपक जयस्वाल  यांना अवैध दारू तस्करीत रामनगर पोलीस पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर रंगेहाथ अटक केली.

रामनगर पोलीस ठाणे येथे मागील दोन तासांपासून त्यांची कसून चौकशी सुरु असून  त्यांच्या चारचाकी वाहनात 35 विदेशी दारूच्या पेट्या सापडल्या चे वृत्त आहे.                 
------------------------------------------------------------
सविस्तर बातमी : 5:10(सायं )-
                                                                        
चंद्रपूर शहरात दारु माफिया म्हणून ज्यांची ओळख आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तथा शहर अध्यक्ष दिपक जयस्वाल यांना पुन्हा पोलिसांनी अवैधरीत्या त्यांच्या राहत्या घराजवळ गाडीमधून दारु उतरविताना त्यांच्या साथीदारांना रंगेहाथ पकडल्या नंतर त्यांचे नाव समोर आल्याने त्यांना पण अटक केली आहे.


यामध्ये दिपक जयस्वाल यांच्यासह राकेश चीत्तुरवार, मयूर लहेरीया यांच्यावर रामनगर पोलीस स्टेशनमधे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.दिपक जयस्वाल यांच्यावर याआधी पडोली पोलीस स्टेशन. गोंडपिंपरी पोलीस स्टेशन येथे सुद्धा गुन्हे दाखल आहे. दुपारी एक वाजता दिपक जयस्वाल यांच्या गजानन मंदिर जवळील एका गोडाऊन मधे गाडीमधून दारु उतरविताना रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हाके आणि उपपोलिस निरीक्षक लाकडे यांच्या टीमनी धाड टाकून हीं कारवाई केली. जवळपास साडेपांच लाखांच्या दारुसाठ्यांसह ऐकून पंधरा लाखांचा मुद्देमाल जब्त करण्यात आला.
-----------------------------------------------------------
-वाढीव बातमी  : (6:15 सायं )-

-कुख्यात दारुतस्कर राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांना जिल्ह्यातून तडीपार करा : ऍड.पारोमिता गोस्वामी यांची मागणी 
दीपक जयस्वाल हे सराईत दारू तस्कर आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होण्याच्या पूर्वीपासून अवैध दारु व्यवसायात असल्याने त्यांच्यावर अनेकदा गुन्हे दाखल झाले आहे. जैस्वाल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून, आपल्या राजकीय वाल्याचा वापर ते अवैध व्यवसायासाठी करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी -  ऍड.पारोमिता गोस्वामी,संयोजिका वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारू मुक्ती अभियान

त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सुद्धा ट्विटरद्वारे ही मागणी केली आहे.

दीपक जयस्वाल हे लीकर असोसिएशनचे अध्यक्ष असल्याने सुरुवातीपासून त्यांनी दारूबंदीच्या विरोधात भूमिका घेतली यानंतरही त्यांनी जिल्ह्यात अवैध दारू पुरवठा कसा करता येईल यासाठी प्रयत्न करित आहे. उल्लेखनीय म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना तिथे दारु तस्करी असताना करताना गोंडपिपरी पोलिसांनी त्यांना पकडले होते व अटक केली होती. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षातूनही काढले होते.

एकीकडे स्वतः अवैध दारूचा पुरवठा करायचा आणि दुसरीकडे दारूबंदी फसली म्हणून सर्वत्र प्रचार करायचा अशी भूमिका जयस्वाल घेत आहे. जयस्वाल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे त्यामुळे ते राजकीय दबाव टाकून अवैध दारू विक्रीला प्रोत्साहन देत आहेत आणि जिल्ह्यातील दारूबंदीला छेद देण्याचा प्रयत्न करीत असल्याने शासनाने त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करावी, अशी मागणी पारोमिता गोस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांकडे ट्विटरद्वारे केली आहे.