विविध सामाजिक संदेश देत पडोली येथे तान्हा पोळा उत्सव उत्साहात साजरा : मनसे चे सामाजिक आयोजन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विविध सामाजिक संदेश देत पडोली येथे तान्हा पोळा उत्सव उत्साहात साजरा : मनसे चे सामाजिक आयोजन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
आज चंद्रपूर तालुक्यातील पडोली(जुनी)या गावात बैल पोळ्याच्या निमित्ताने तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


यात बाल गोपालांनी कुर्ता, बंगाली, धोतर, साडी चोळी, डोक्यावर फेटा, टोपी, हातात काठी घेऊन शेतकरी असल्याची भूमिका निभावत पोशाख धारण करून कार्यक्रमात उपस्थिती दर्शवीली, यावेळी बेटी बचाओ, बेटी पढाओ, झाडे लावा झाडे जगवा, शेतकरी आत्महत्या अशा विविध सामाजीक संदेश देणारी सजावट मुलांनी केली होती. 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मनविसे तालुका अध्यक्ष तथा चिंचाळा ग्रा. पं. सदस्य विवेक धोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून महापारेषण चे उपकार्यकारी अभियंता विक्रम टोंगे, इंजि. अनुप माथनकर,इंजि. अविनाश रोडे,संबुजी मासिरकर,बंडू जी जोगी प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी विवेक धोटे यांनी बाळ गोपालांना तान्हा पोळ्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी मार्गदर्शन केले व आपल्या भारतीय संस्कृती चे जतन करण्यासाठी लहानपणीपासुनच आपल्या सणांची ओळख राहावी म्हणून असे कार्यक्रम आम्ही नियमितपणे करू अशी ग्वाही दिली.


या तान्हा पोळा स्पर्धेत प्रथम क्रमांक गीतेश वाढई, द्वितीय क्रमांक, शिव नागरकर तर त्रितीय क्रमांक साहिल चव्हाण व आराध्या पिंपळशेंडे यांनी पटकावले तर प्रत्येक नंदिधारकला आकर्षक पारितोषिक वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन-मनसे तालुका अध्यक्ष प्रकाश भाऊ नागरकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कपिल झाडे, लखन कासवटे, बाळू कासवटे, राज पारडे, सतिश मरसकोल्हे,राम कांबळे, संतोष पारडे, शरद कामतवार, अशोक मिलमिले, वैभव झाडे, निखिल चौधरी, गुणवंत जोगी, राकेश चौधरी,सुरज नागरकर, आशिष वनकर,आशिष मिलमिले यांनी मेहनत घेतली...