पाकिस्तान वरून निघालेली गुरुनानकांच्या ग्रंथ साहेबांची यात्रा उद्या पोहोचणार चंद्रपुरात : - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पाकिस्तान वरून निघालेली गुरुनानकांच्या ग्रंथ साहेबांची यात्रा उद्या पोहोचणार चंद्रपुरात :

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 

गुरूनानक यांनी 550 वर्षांपूर्वी लिहिलेले ग्रंथ व अन्य साहित्य घेवून पाकीस्तानमधून निघालेली यात्रा उद्या 15 सप्टेंबर रोजी वरोरा शहरात दाखल होणार आहे. ग्रंथ आणि अन्य साहित्य नागरीकांना बघता यावे तसेच दर्शन घेता यावे याकरीता ही यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा उद्या वोरोरा येथील आनंदवन चौकात येणार आहे.

ननकाना जाहिब पाकीस्तानमधील गुरूनानक यांच्या जन्मस्थळापासून यात्रा प्रारंभ करण्यात आली.  भारतातील 19 राज्यांमधून यात्रा मार्गक्रमण करीत नुकतीच नागपूरात पोहचली आहे.

14 सप्टेंबर रोजी यात्रा नागपूरात मुक्कामी राहून उद्या 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता वरोरा येथील आनंदवन चौकात पोहचताच यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. गुरूनानक यांनी स्वतः लिहिलेले ग्रंथ यात्रेमध्ये ठेवण्यात आले आहे. यात्रा वरोरा येथील स्वागत स्वीकारल्यानंतर चंद्रपूर नजीकच्या पडोली येथे फोर्ड शोरूमच्या समोर आयोजित कार्यक्रमात पोहचणार आहे.

यात्रेतील भक्तांना पडोली येथे नाश्ता व जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे.