आदर्श ग्राम घाटकुळ तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अशोक मेदाळे अविरोध गावात दारू विक्री करणार्‍यावर १० हजार दंड : ग्रामसभेचा निर्णय - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदर्श ग्राम घाटकुळ तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अशोक मेदाळे अविरोध गावात दारू विक्री करणार्‍यावर १० हजार दंड : ग्रामसभेचा निर्णय

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :पोंभुर्णा -अविनाश पोईनकर 
          
तालुक्यातील चर्चित आदर्श ग्राम घाटकुळ येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समीतीचे पुनर्गठन ग्रामसभेत करण्यात आहे. अशोक पत्रू मेदाळे यांची अविरोध निवड करण्यात आली. गावात शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्यात येत आहे. गावात दारुविक्री करणा-यांवर दहा हजार रुपये दंड वसूल करुन कारवाई करण्याचा महत्वाचा निर्णय ग्रामसभेत ठराव घेवून करण्यात आला आहे.


महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट ग्राम पंचायत घाटकुळ नाविण्यपुर्ण उपक्रम व लोकसहभागामुळे जिल्ह्यात नावलौकीकास आले. ग्रामसभा सक्षमीकरणामुळे कल्याणकारी निर्णय गावकरी घेत आहे. गावात पुर्णपणे दारुबंदी व व्यसनमुक्ती करण्यासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक मेदाळे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या निवडीबद्दल गणपती पाल, सुनिल तेलंगे, प्रतिमा दुधे, कल्पना शिंदे, अरुण मडावी, नवनाथ डायले, प्रकाश वाकुडकर, सुदर्शन खोबरे, विक्रम देठे, राजेश्वर मेदाळे, शरनम गायकवाड, अतुल लोणारे, प्रज्ञा देठे, सरपंच प्रिती मेदाळे, उपसरपंच गंगाधर गद्देकार, पोलीस पाटील अशोक पाल यांनी त्यांचे अभिनंदन केले