रोडवरून पायदळ चालणाऱ्या इसमास भरधाव दुचाकीने मागून ठोकले : इसम जागीच ठार : जमावाने दुचाकीस्वारास बदडले - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रोडवरून पायदळ चालणाऱ्या इसमास भरधाव दुचाकीने मागून ठोकले : इसम जागीच ठार : जमावाने दुचाकीस्वारास बदडले

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -

शहरातील पेपर मिल मुख्य प्रवेशद्वार समोरील कलामंदिर जवळ पायदळ जाणाऱ्या इसम लक्ष्मीकांत कैथवास यांना चंद्रपूर हुन येणाऱ्या भरधाव दुचाकीने धडक दिली असता जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली.


बल्लारपूर शहरातील  गोकुल नगर वॉर्ड रहिवासी मृतक लक्ष्मीकांत कैथवास(43)तहसील कार्यालयात काही कामा निमित्य घरून पायदळ निघाला होते.  मेन रोड वरून पायदळ  जात असताना चंद्रपूर हुन भरधाव गतीने येणारा बाईक क्र.Mh-34Bk-7565 या Tvs बाईक स्वार ने लक्ष्मीकांत यांना मागून जबरदस्त धडक दिली,धडक इतकी जबरदस्त होती की लक्ष्मीकांत जाग्यावरच मृत्यू मुखी पडले.

घटना घडल्यावर थोडा वेळ कुणालाही नेमके काय घडले संभ्रम होता. घटनास्थळी मृतक रोड च्या बाजूला पडून दिसताच पळ ठोकू पाहणाऱ्या दुचाकी स्वाराला तेथील नागरिकांनी घेराव करून बेदम बदडले. काही वेळातच आरोपीला अटक करून आपल्या ताब्यात घेऊन पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.