इंफॅण्ट जिसस शाळेचे खेळाडू क्रिकेटर जिल्हा स्तरीय स्पर्धेचे विजेते - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

इंफॅण्ट जिसस शाळेचे खेळाडू क्रिकेटर जिल्हा स्तरीय स्पर्धेचे विजेते

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :राजुरा - 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांचा संयुक्त विद्यमाने  जिल्हा स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा 2019-20 चे आयोजित करण्यात आले होते. 


या स्पर्धेत इंफॅण्ट जीसस हायस्कुल राजूरा येथील खेळाडू 17 वर्ष आतील  गटात तालुका स्तरीय जिंकून सहभागी झाले व त्यांनी स्पर्धेत सहभागी इतर शालेय संघावर मात करीत दणदणीत विजय मिळविला. श्री मयूर खेरकर शारीरिक शिक्षक यांचा प्रशिक्षण व मार्गदर्शनात प्रसन्न मंगरुळकर, विशेष बिस्वास्, हर्षदीप नहर, अब्दुल कुरेशी, कौतुक मेश्राम, चिरंजित मंडल, भूषण वांढरे, तस्लिमा सिद्दिकी, गारवा करमरकर, श्रेयस कातकर, प्रांजल बोरकुटे, अभिजित मोहुर्ले, सिद्धार्थ गोरे, रोहित धुमने, जीवन सुखदेव, रोहन मुनगंटीवार, मिनाथ बोनसुरे या खेळाडूंनी विजय मिळविला असून ते विभागीय स्पर्धे साठी पात्र झाले आहे.

खेळाडूंचा यशाबद्दल राजुरा तालुका क्रीडा समितीचा वतीने संयोजक श्री हरिश्चंद्र विरुटकार, श्री किशोर चिंचोलकर, कु पुर्वा खेरकर, श्री भास्कर फरकाडे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.