सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू : सिंदिवाही तालुक्यात संपेना मानवी-वन्यजीव संघर्ष - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू : सिंदिवाही तालुक्यात संपेना मानवी-वन्यजीव संघर्ष

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : सिंदेवाही -

सिंदेवाही पासुन पश्चिमेला 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवणी या गांवातील तरूण प्रमोद हरिदास करकाळे (37) हा शिवणी शेतसिवारातील आपले स्वतःचे शेतावर दुपारी धान पिकावर खत देण्याचे काम करीत होता. धानाचे बांधीत उतरून धानावर खत मारत असतांना अनोळखी विषारी सापाने त्याचे उजव्या पायाला चावा घेतल्याने उपचारासाठी  तात्काळ शासकीय ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाही येथे आणले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

त्याचा चुलतभाऊ पांडुरंग बुधाजी करकाडे  राहणार शिवणी याने सिंदेवाही पोलीस स्टेशनला येऊन तोंडी रिपोर्ट दिली. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी मृतकाचे शवविच्छेदन केले असून त्याचे शव नातेवाईकांना सोपविण्यात आले. मृतक विवाहित असुन त्याचे पश्चात आई, वडील, पत्नी व मुले असल्याचे सांगितले. सदर मर्गाचा तपास पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लेनगुरे हे करीत आहेत.