ब्रेकिंग न्यूज : भाजपा नेते संजय देवतळेंच्या हाताला शिवबंधन? : - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : भाजपा नेते संजय देवतळेंच्या हाताला शिवबंधन? :

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :वरोरा -

चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन काँग्रेस चे आमदार व सद्यःकालीन भाजपा चे नेते संजय देवतळे हे शिवसेना पक्षप्रमुखांच्या संपर्कात असून लवकरच शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
         
विधानसभा 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस ने उमेदवारी अर्ज भरण्याच्या रांगेत उभे असताना ऐनवेळी उमेदवारी त्यांच्याच घरातील डॉ आसावरी देवतळे यांना दिल्याने अनपेक्षित राजकीय मुसंडी मारत अचानक भाजपा कडून उमेदवारी अर्ज दाखल करून कार्यलयाच्या बाहेर उभ्या हजारो समर्थकांना त्यांनी अजब धक्का दिला होता.

ऐनवेळी भाजपा कडून उमेदवारी मिळवत निवडणुकीच्या रणांगणात शिवसेनेच्या बाळू धानोरकर विरोधात अवघ्या 2004 (धानोरकर -53877, देवतळे -51873) मतांनी पराभूत झाल्यावर, भाजपात राहतील की इतर काही राजकीय पर्याय शोधतील अश्या अनेक चर्चा सुद्धा त्यानंतर उठत राहिल्या.

राज्यात भाजपा-शिवसेना युती झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती क्षेत्र शिवसेनेच्या पारड्यात जाण्याची हमी अनेकांना आहे. याच क्षेत्रातून शिवसेनेचे आमदार असलेले बाळू धानोरकर यांनी लोकसभा 2019च्या निवडणुकीती शिवबंधन तोडून राज्यात काँग्रेस चे एकमेव खासदार होण्याचा मान मिळविला त्यामुळे शिवसेनेकरिताही ही जागा प्रतीष्टेची मानली जात असून पुन्हा धानोरकर यांनी काँग्रेस कडून आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांची विधानसभा उमेदवार म्हणून सुरु केलेली जय्यत तयारी ध्यानात घेता,युतीला ही जागा जिंकून आणने अतिआवश्यक झाले आहे.

बाहेरून आलेल्या अनेक उमेदवारांनीही आपली जय्यत तयारी या क्षेत्रात चालविली असून युतीच्या अंतर्गत गटात ही जागा जिकंण्याकरिता शक्य सर्व तरजोडी सुरु असून या क्षेत्रात आजही प्रबळ उमेदवार म्हणून दावेदार असलेले संजय देवतळे हे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना सचिवांच्या संपर्कात असून येत्या एक दोन दिवसात युतीची घोषणा झाल्याबरोबर संजय देवतळे शिवबंधन बांधण्यास सज्ज असल्याचे शिवसेनेच्या अंतर्गत गटाकडून खात्रीलायक वृत आहे.
------------------------------------------------------------
खबरकट्टा च्या वरोरा भद्रावती व्हाट्स अप (whats app) ग्रुप वर सामील होण्याकरिता खालील लिंक वर टच करा व वाचा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बातम्या. https://chat.whatsapp.com/IbPvfrrPqYu0jxkSM9UYGr