वनरक्षक ,तलाठी व राज्य परिवहन महामंडाळातील भरतीत मोठा घोटाळा : गैरव्यवहाराची चौकशी करण्याची राजू झोडे यांची मागणी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वनरक्षक ,तलाठी व राज्य परिवहन महामंडाळातील भरतीत मोठा घोटाळा : गैरव्यवहाराची चौकशी करण्याची राजू झोडे यांची मागणी

Share This
-तात्काळ उच्चस्तरिय चौकशी करुन गैरव्यवहार करणार्यावंर कारवाई करावी अन्यथा तिव्र आंदोलनाचा राजु झोडे यांचा ईशारा

खबरकट्टा / चंद्रपूर : 

शासनाद्वारे वनरक्षक तलाठी व राज्यपरिवहन मंडळातील विविध पदांसाठी परिक्षा घेण्यात आली होती तसेच निवड झालेल्या उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आली. परंतु आँनलाईन परिक्षेत गैरहजर असलेल्या उमेदवारांची सुद्धा निवडयादीमध्ये नावे असल्याने सदर निवड प्रकियेत मोठा भ्रष्टाचार व घोळ झाला असल्याचा आरोप उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे यांनी केला आहे.

              
एकीकडे राज्यातील युवक मोठ्या प्रमाणात बेरोजगारीने त्रस्त आहेत. नौकरी मिळेल या आशेने नोकरभरती मधे निवड होण्यासाठी प्रचंड मेहनत करुन भरतीची तयारी करतात परंतु शासनाची भ्रष्ट व्यवस्था बेरोजगार युवकांच्या परिश्रमाला व गुणवत्तेला डावलुन गैरमार्गाने अपात्र व परिक्षेला अनुपस्थीत विद्यार्थ्यांची निवड करुन लायक उमेदवाराच्या परिश्रमावर व गुणवत्तेवर आळा आणतात. 

हजारो रुपये परिक्षा शुल्क भरुन व आर्थिक भार सहन करुन रोजगाराच्या आशेवर विद्यार्थी जिवाचे रान करुन मेहनत घेतात आणि त्यावर मलाई खाणारे भ्रष्टाचार करुन मोकळे होतात हा मोठा अन्याय असुन सदर भरतीप्रकीयेतील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी व गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना सेवेत सामावुन घ्यावे याकरिता राजु झोडे व कार्यकर्त्यांनी शासनास निवेदन दिले. 

जर उच्चस्तरीय चौकशी करुन दोंषीना शिक्षा दिली नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा राजु झोडे यांनी प्रशासनाला दिला,सदानंद करमनकर,अभिजीत येरमे,अनुरूप पाटिल,पंचशिल तामगाडगे,रुपेश चनुरवार ,अमर धोंगडे आदि कार्यकर्ता उपस्थित होतों