विसर्जनादम्यान काठावरील रस्ता खचून, मूर्ती कोसळली : कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

विसर्जनादम्यान काठावरील रस्ता खचून, मूर्ती कोसळली : कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :शहर प्रतिनिधि-

चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जनादरम्यान रात्री दिड वाजताच्या दरम्यान रामाळा तलावावरील विसर्जनस्थळी सिव्हिल कॉलनी च्या गणेश मंडळाची गणेशमुर्ती असलेली ट्राँली विसर्जन स्थळी रस्ता खचल्याने कोसळून पडली. 

रामाळा तलाव जवळ तयारकरण्यात आलेल्या विसर्जन स्थळी काल दिवसभर शहरातील सर्वच सार्वजनिक मंडळांच्या अनेक मुर्त्यांचे विसर्जन सुरु होते. दरम्यान रामाळा तलावावरील विसर्जनस्थळी सिव्हिल कॉलनी च्या गणेश मंडळाची गणेशमुर्ती असलेली ट्राँली विसर्जन स्थळी रस्ता खचल्याने कोसळून पडली. मंडळाची गणेश मूर्ती विसर्जनाकरिता वळाली असता अचानक रस्त्यावरील पॅव्हर्स खालचा रस्ता खचून जमिनीखाली आता साधारण दीड ते दोन फूट खचला त्यात  बाप्पाच्या मुर्तीअसलेली ट्रॉलीच तलावाच्या दिशेने कोसळली.

ट्राँलीवर असलेल्या कार्यकर्त्यांनी प्रसंगवधान ओळखून तात्काळ ट्रॉलीवरून उड्या मारल्यामुळे तलावात पडता वाचले व जीवितहानी टळली. 

कोसळलेल्या मुर्तीला उचलण्यासाठी मनपाची कोणतेच मदत पथक पोहोचले नाही उलट तुमची मुर्तीच वजनदार असल्यामुळे रस्ता खचला हे उत्तर मिळाले असे सिविल लाईन्स गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टीम सोबत बोलताना सांगितले.