डोंगरहळदी येथील महिलांचा मोहफुलाच्या दारू निर्मिती ठिकाणावर हल्ला : पोलिसांच्या मदतीने हजारो लिटर सडवा नष्ट - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

डोंगरहळदी येथील महिलांचा मोहफुलाच्या दारू निर्मिती ठिकाणावर हल्ला : पोलिसांच्या मदतीने हजारो लिटर सडवा नष्ट

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

पोंभुर्णा तालुक्यामध्ये डोंगरहळदि येथे  जंगलामध्ये  मोठ्याप्रमानात मोहफुलाची दारू बनविने सुरू होते.याची माहिती डोंगरहळदि येथील महिला मंडळाच्या महिलांना मिळताच त्यांनी उमरी येथील पोलीस स्टेशन च्या ठाणेदारांना याची माहिती दिली तेव्हा पोलीस ठाण्याचे ठाणेदार व महिला मिळुन त्या घनदाट जंगलात जाऊन अनेक ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केला व काही लिटर दारु जप्त केली. 

ऐवढा मोठा साठा पाहुन महिला व गावकरी अचंबित झाले  तर काही आरोपी पळुन जाण्यास यशस्वी झाले. यात चार दिवसात आठ आरोपींना अटक करण्यात आली१९ प्लास्टिक ड्रम्स व छाटे मोठे मातीचे मडक्यांमध्ये  प्रत्येकी अंदाजे २०० किलो प्रमाणे एकूण ४००० किलो मोहा सडवा रसायन अंदाजे लाखो रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे. 

पोलिस स्टेशन ने कलम ६५ (फ) म.दा.का नुसार गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई उमरी पोलीस स्टेशन ठाणेदार दराडे  यांच्या मार्गदर्शनात झाली , असून पो.हवा रुपेश, मनिषा बुरांडे, व सुनिल यांनी केली आहे. व पुढील तपास ठाणेदार दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे.