आदर्श शाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन : विध्यार्थीनी तयार केल्या मातीच्या गणेशमूर्त्या : राष्ट्रीय हरित सेना विभागाचा अभिनव उपक्रम. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आदर्श शाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन : विध्यार्थीनी तयार केल्या मातीच्या गणेशमूर्त्या : राष्ट्रीय हरित सेना विभागाचा अभिनव उपक्रम.

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा प्रतिनिधी -


बालवीद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल च्या राष्ट्रीय हरित सेना विभागामार्फत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले.यावेळी यश ठाकुर या विध्यार्थी सोबत अनेक विध्यार्थीनी मातीच्या गणेशमुर्त्यांचि निर्मिती केली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे या होत्या.तर प्रमुख अतिथि म्हणून बालवाडीच्या मुख्याध्यापिका मंगला मोरे ,सहायक शिक्षक नवनाथ बुटले ,रुपेश चिडे , शीवाद्या ढोल वाद्य पथक चे ऑस्टिंन सावरकर ,विलास खिरटकर , केतन जुनघरे आदींची प्रामुख्याने उपस्थिति होती.राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्या संकल्पनेतून या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.


विध्यार्थीनी तयार केलेल्या मूर्तींची वीधीवत पूजाअर्चणा करून जवळच असलेल्या वननाल्यात त्या मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले.यावेळी राजुरा शहरात नव्यानेच तयार झालेल्या शिवाद्या ढोल वाद्य पथकाणे आपल्या ढोल ताश्या च्या नादाने उपस्थितांचे लक्षवेधले. मान्यवरांनि आपल्या मार्गदर्शनातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच प्लास्टिक ,थर्माकॉल न वापरता  व नदी नाले  प्रदूषित न करता आनंदोत्सव साजरा करा असेही आवाहन केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल बेले यांनी केले तर आभार सुनीता कोरडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व शिक्षक -शिक्षिका व राष्ट्रीय हरित सेने च्या विध्यार्थीनी अथक परिश्रम घेतले.