अतिवृष्टीने पडलेल्या घरांची व शेतकऱ्यांच्या शेतातील वाहुन गेलेल्या रोवण्याची तात्काळ नुकसान भरपाई देवुन घरकुल मंजुर करा : श्रमिक एल्गार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अतिवृष्टीने पडलेल्या घरांची व शेतकऱ्यांच्या शेतातील वाहुन गेलेल्या रोवण्याची तात्काळ नुकसान भरपाई देवुन घरकुल मंजुर करा : श्रमिक एल्गार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :सिंदेवाही 

मागील एक ते दिड महीण्यापासुन अतिवष्टीने  घरांची पडझड होत असुन अनेक जखमी होवुन जीव सुध्दा गमविले तसेच शेतकऱ्यांच्या शेतात असलेला रोवणा वाहुन गेल्याने प्रचंड नुकसान झालेली आहे श्रमिक एल्गार याची गंभिर दखल घेत श्रमिक एल्गारचे सिंदेवाही तालुका अध्यक्ष शशिकांत बतकमवार यांचे नेतृत्वात शिष्टमंडळाने सिंदेवाही चे तहसिलदार पाठक साहेब यांना निवेदन दिले. 


यावेळी तहसिलदार पाठक यांचे कडे अतिवृष्टीने अनेकांचे घरे पडले त्यांना तात्काळ नुकसानभरपाई देवुन घरकुल मंजुर करवे, तसेच शेतऱ्यांच्या शेतातील वाहुन गेलेल्या रोवणीची नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.   नुकसान झालेल्या शेकडो व्यक्तीची यादी निवेदनासोब देण्यात आली. 

यावेळी तहसिलदार यांनी पंचनामे करुन मदत करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला  दिले. शिष्टमंडळ म्हणुन श्रमिक एल्गारचे सिंदेवाही तालुका अध्यक्ष शशिकांत बतकमवार, शांताराम आदे, रवि नैताम, शारदा खोब्रागडे, संगिता गेडाम, मनोज आदे, प्रतिभा आदे, मंगला सोनुले, जोत्सना चौधरी, शारदा चौधरी, निरंजन आदे, छाया आदे,भारत ठाकरे, ज्याती आदे उपस्थित होते.