अवैध तांदूळ तस्करी करणाऱ्या ओव्हरलोड वाहनाखाली दबून वृद्ध इसमाचा मृत्यू : चालक फरार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अवैध तांदूळ तस्करी करणाऱ्या ओव्हरलोड वाहनाखाली दबून वृद्ध इसमाचा मृत्यू : चालक फरार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 
तालुका मुख्यालयापासून 10किलोमीटर अंतरावर असलेल्या मुर्ती गावानजीक तांदळाची अवैध वाहतुक करणार्‍या पिकअप वाहनाचा तोल जाऊन, वाहनाखाली  दबून गोसाई पिपरे(वय -70) ह्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन वाहनचालक अभिलाष चांदेकर फरार झाल्याची माहिती मिळाली आहे.
तेलंगणा राज्यातून परिसरात रेल्वेच्या माध्यमातुन स्वस्त तांदळाची अवैध तस्करी होत असते. काल रात्री वाहतूक परिवहन अधिकाऱ्याची गस्त असल्यामुळे विरूर स्टेशन येथे हा अवैध रित्या साठवून ठेवलेला माल पोहोचता करणे शक्य नसल्याने, सदर वाहन मुर्ती गावाजवळ नेण्यात आले होते. 
आज सकाळी हे तांदुळ भरलेले विरूर स्टेशन येथिल प्रदीप पाला ह्यांच्या मालकीचे पिकअप वाहन चालक अभिलाश चांदेकर घेऊन येत असताना मुर्ती नाल्याजवळ तोल गेल्यामुळे उलटले.

नेमके त्याच सुमारास मूर्तीचे माजी सरपंच रामकृष्ण पिपरे ह्यांचे वडील गोसाई पिपरे हे शौचास जात होते. त्याच वेळी पिकअप उलटल्याने गोसाई पिपरे वाहनाखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला असुन वाहनचालक अभिलाष  चांदेकर फरार आहे.

विरूर पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार तिवारी ह्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथे पाठविण्यात आला असुन अधिक पोलीस तपास सुरू आहे.