राज्यात भाजपकडून उमेदवारी विषयी ३ ऑक्टोबरला मोठा धमाका होण्याची शक्यता : बंडखोरांना लगाम लावण्याची तयारी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राज्यात भाजपकडून उमेदवारी विषयी ३ ऑक्टोबरला मोठा धमाका होण्याची शक्यता : बंडखोरांना लगाम लावण्याची तयारी

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र :

सत्ताधारी भाजप शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीची तयारी करताना दिसत आहेत. असे असले तरी भाजप आणि शिवसेनेचे जागावाटप अजूनही निश्चित झालेले नाही. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. भाजपकडून उमेदवारी विषयी ३ ऑक्टोबरला मोठा धमाका होण्याची शक्यता आहे.
नागपूरच्या उमेदवारीसाठी भाजप सध्या वेट अँड वॉच मूडमध्ये आहे. कारण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ४ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. या तारखेच्या आधीच्या दिवशी म्हणजेच ३ ऑक्टोबरला भाजप कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पाडून मोठा धमाका करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यात नागपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे.

उमेदवारीविषयी दिल्लीत बैठक झाल्यानंतर विकास ठाकरे, गिरीश पांडव, नितीन राऊत, बंटी शेळके यांची नावे नागपूरमधून निश्चित झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु काही नेते शुक्रवारी दिल्लीतून नागपुरात परतताच नावे बदलली आहेत. दक्षिणेत प्रमोद मानमोडे आणि विशाल मुत्तेमवार, मध्यमधून ऍड. कुरेशी आणि नंदा पराते, पूर्व नागपूर विधानसभेसाठी उमाकांत अग्निहोत्री यांची नावे पॅनेलमध्ये असल्याचे सांगण्यात आले.

गडचिरोलितही विद्यमान आमदार होळी यांच्या उमेदवारी वर फरेबद्दल होण्याची दाट शक्यता असून अहेरीत बदल झालेल्या नावावर राज्य समितीने अंतिम निर्णय केंद्र समितीवर सोपवल्याचे वृत आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना पक्षात घेतले आहे. परंतु उमेदवारीवरून भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने उमेदवारांची नावे फक्त एक दिवस आधी घोषित करण्याची ठरवले आहे.

तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील 3उमेदवार निश्चित झाले असून सर्वच ठिकाणी असलेली छुपी बंडखोरी घ्यानात घेता व उर्वरित 3 पैकी वरोरा - वणी जागा फेरबदला करिता असलेल्या  आग्रहाला अजून मातोश्री दरबारीं अंतिम स्वरूप मिळाले नसल्याने AB फॉर्म पक्ष संघटकांकडे पोहोचून सुद्धा निश्चित उमेदवारांनाही 3 ऑक्टोबर पर्यंत वाट बघावी लागत आहे.