राजुरा शहरात पुन्हा एकदा सामाजिक एकता व बंधुभावाचे प्रदर्शन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा शहरात पुन्हा एकदा सामाजिक एकता व बंधुभावाचे प्रदर्शन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : शोएब शेख - राजुरा 

शहरातील भारत चौक येथे दि. १०/ ०९ /२०१९ रोजी इस्लामिक नववर्षाच्या इस्लामिक १० तारखेला यौमे- ए- आशुरा करबला मध्ये शहिद झालेल्या शहिदांची आठवण त्यांच्या आत्म्यास शांती मिळण्याकरिता, उपवास करून श्रद्धांजली अर्थातच खिराजे – ए- अकीदत पेश करण्याचा दिवस म्हणजेच मोहरम.
              

या दिवशी संपूर्ण जगातील इस्लाम धर्मीय मुस्लिम समुदाय आपल्या रुढी परंपरेनुसार हा दिवस पाळतात तसेच आपल्या भारत देशात इतरही समुदाय सुद्धा मोहरम चे दुःख पाळतात. याचे  औचित्य साधून शरबत वितरण आणि प्रसाद वितरणाचा कार्यक्रम राजुरा शहरातील भारत चौक येथे  मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन पार पाडला. 

रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबवून शरबत वितरण करण्यात आले. सर्व समाज बांधवांनी आणि भाईचारा व एकता कायम करून भारत चौक नदीमोहल्ला येथील नवयुवकांनी शरबत वितरणाचा कर्यक्रम पार पाडला. यात शहरातील नवयुवक व सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमात योगदान देऊन सहकार्य केले व कर्यक्रम पार पाडला.