राजुरा तालुक्यातील गावकऱ्यांचा पार्सल उमेदवारीवरून भोंगळेंच्या उदघाटन कार्यक्रमाला मज्जाव : पार्सल उमेदवारी दिल्यास अनेक गावातील सरपंचाचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा तालुक्यातील गावकऱ्यांचा पार्सल उमेदवारीवरून भोंगळेंच्या उदघाटन कार्यक्रमाला मज्जाव : पार्सल उमेदवारी दिल्यास अनेक गावातील सरपंचाचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा 

विधानसभा निवडणूक पार्श्ववभूमीवर राजुरा विधानसभेतही अनेक पक्षांच्या उमेदवारांचा उमेदवारीकरिता पक्षश्रेष्टींकडे तगादा सुरु असून मात्र राजुरा विधानसभेत भारतीय जनता पार्टीत वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. 

राजुरा विधानसभेत भरतीत जनता पक्षाचे ऍड. संजय धोटे हे सध्या आमदार असून त्याच पक्षातील अनेक उमेदवारांनी आपापली दावेदारी दाखविली आहे.त्यात सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे. 

पक्षाने आतापर्यंत कोणतीच अधिकृत उमेदवारी जाहीर केली नसून निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी त्यांची आढावे, दौरे, गौऱ्या-गणपत्यांना वर्गण्या वाटणे व गेल्या अडीच वर्षांत जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कधीही कोणत्याही उद्धघाटनांला न फिरकलेले  परंतु आता  सपाटा लाऊन आपल्या दावेदारीचा झंझावात निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचा प्रत्यय आज विधानसभेतील जनतेला आला. 

राजुरा तालुक्यातील  कळमना, चिंचोली,वरूर, सोंडो,देवडा भुरकुंडा खुर्द,भुरकुंडा बु सुकडपल्ली,या गावांमध्ये आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा वापर करून विविध बांधकाम कामाचे उदघाटन कार्यक्रम आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी ठेवला होता. परंतु सदर गावातील नागरिकांनी कळविलेल्या वृत्तानुसार सरपंच, उपसरपंच व पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी  गावात  कार्यक्रम करण्यास सपेशल नकार दिला असून भोंगळे यांना गावात पोहोचण्यास मज्जाव करण्यात आला.

फोटो : कळमना गावातील रद्द झालेले उदघाटन 

अनेक नागरिकांचे म्हणणे आहे की ऍड धोटे सारखा आमदार व  उमेदवार आमच्याकडे असून आम्ही वेळेवर आलेल्या उपऱ्या उमेदवारांना स्वीकारणार नाही वेळ पडल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही तयारी असल्याचे एका गावातील सरपंचानी नाव न लिहिण्याच्या अटीवर दूरध्वनी संभाषणावरून कळविले.

एरवीच्या राजकारणात कधी कोन स्वतः  आपण कसे  सर्वात प्रभावी हे दाखविण्याकरीता आततायीपणा  करत आहे  याची खमंग चर्चा सध्या राजुरा विधानसभेतील राजकीय वातावरणात सुरु आहे. भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठ्या असलेल्या या विधानसभेत सर्वपरी अनेक विविधता आढळते व अनेक भागात आपापले राजकीय वर्चस्व असणारी अनेक पुढारी मांडळी अस्तित्वात असुनही व आजी स्वच्छ प्रतिमेच्या, संयमी, जनता व अधिकाऱ्यांचा योग्य समतोल साधणारा सोज्वळ आमदार पक्षाकडे असताना आणि विषेश करून विधानसभेतील पक्षाच्या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांची आजही पहिली पसंती ऍड. संजय धोटे यांच्या बाजूने असताना, भोंगळे यांची करु पाहिलेली घुसमुजोरी पक्षाचा स्थानिक जनाधार पार्सल उमेदवार स्वीकृत करणे श्यक्य नाही असे मत  अनेक कार्यकर्त्यांनी टीम सोबत बोलताना व्यक्त केले.

भोंगळे यांचा जिल्हा परिषद पदाचा वापर करून व फक्त गोंडपिपरी तालुक्यातील काही उतावीळ नगरसेवकांच्या साथीने  राजुरा विधानसभेत वावर सुरु आहे त्याची परिणीती पक्षाच्या भविष्याकरिता  कशी बदलू शकते हे आजचा अचानक घडलेला  प्रसंग भरपूर काही सांगून जाते.