प्रेमात सैराट होणे बेतले जीवावर : प्रेयसीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

प्रेमात सैराट होणे बेतले जीवावर : प्रेयसीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : भद्रवती प्रतिनिधी -

भद्रावती तालुक्यातील खैरगाव येथील कोमल राम गराटे (21) व लगतच्या  निंबाळा गावातील हेमंत दडमल (25) यांचे अनेक वर्षांपासून प्रेम संबंध होते.आपल्या भविष्याचे सोनेरी स्वप्न रंगवीत दोघांनी काल दिनांक 1सप्टेंबर गणेश स्थापनेच्या आदल्या रविवारी रात्री दोघांनीही पळून जाण्याची  योजना आखली.

त्याची आंबजावणी करत दोघेही रात्रीच्या अंधाराचा आसरा घेत आपापल्या घरून निघाले त्यानंतर योजने नुसार दोघेही पळून जात असताना रस्त्यातील विठ्ठल गेडाम यांच्या शेतातून मार्ग काढत पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न थेट कोमलला यमाच्या दारात खेचून घेऊन गेला.


या दरम्यान गेडाम यांच्या शेतातील जिवंत तारांना स्पर्श कोमलला झाला आणि विजेचा जोरदार धक्का लागल्याने कोमलचा जागीच मृत्यू झाला. प्रियकर हेमंत दडमल यांनी दोन वेळा मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यालाही ही विजेचा स्पर्श झाल्याने तोही बाजूला झाला. हे ठिकाण आनंदवन खैरगाव मजरा या गावाच्या मधोमध आहे. 

यानंतर प्रियकरानीं सकाळी वरोरा पोलीस स्टेशन पोलिसांना सर्व घटना सांगितली आता धक्कादायक घटना उघडीस आली आहे.त्यानंतर हा सर्व प्रकार उघडीस आला.मात्र पळून जायचा प्रेमीयुगुलांचा डाव नियतीने वाटेतच घाव घालून मोडून काढला.या घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.