जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात तडकाफडकी बदल्या : राजुरा, मूल चे ठाणेदार बदलले - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात तडकाफडकी बदल्या : राजुरा, मूल चे ठाणेदार बदलले

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :

जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात तडकाफडकी बदल्याकरण्यात आल्या असून या संबंधाचे पत्र पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी आज दिनांक 9सप्टेंबर 2019 रोजी सायंकाळी 7वाजता जारी केले आहे. 


या तात्काळ प्रभावी तात्पुरत्या बदल्या पुढीलप्रमाणे  :
1)पोलीस निरीक्षक श्री सतीशसिंह राजपूत यांची नागपूर ग्रामीण येथून पोलीस ठाणे मूल येथे, 

2)मूल चे पोलीस निरीक्षक श्री एम एम कासार यांची पोलीस ठाणे राजुरा, 

3)राजुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री पी एम मडामे यांची नियंत्रण कक्ष चंद्रपूर, 

4)नियंत्रण कक्षातील निरीक्षक श्री एस डी धुळे यांची वाहतूक नियंत्रण उपविभाग (चिमूर, मूल, ब्रम्हपुरी) तर 

5)पडोलीचे ठाणेदार श्री बी एम गायगोले यांची पोलीस कल्याण विभाग चंद्रपूर 

येथे तात्काळ प्रभावात बदली करण्यात आली असून मागील आठवड्यातच जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षक, उपपोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या हे विषेश.