कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता उपोषणाने वाढदिवसास साजरा करणारा सच्चा शिवसैनिक - बंडू हजारें - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता उपोषणाने वाढदिवसास साजरा करणारा सच्चा शिवसैनिक - बंडू हजारें

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : दुर्गापूर -

चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना नेमकी काय करीत आहे याचा थांगपत्ता लागत नसतांना कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची स्वतंत्र ओळख आहे असे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी  सेनेचे जिल्हाप्रमुख व शिव वाहतूक सेनेचे उपजिल्हा प्रमुख बंडू हजारे यांच्या वाढदिवशी त्यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्दूत निर्मिती केंद्रातील कामगारांच्या विविध मागण्या घेऊन एक दिवशीय धरणे आंदोलन केले. 

अनेक नेते, कार्यकर्ते आपला वाढदिवस दानधर्म करून साजरा करताना आढळतात परंतु चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात बहुदा हे पहिलेच उदाहरण असेल की ज्यांनी आपला वाढदिवस कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरिता आंदोलन करून साजरा केला. 

बंडू हजारें यांनी सीटीपीएस प्रशासनाकडे कामगारांच्या अनेक मागण्या लाऊन धरल्या त्यापैकी -
1)कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देण्यात यावे. 2)कामगारांना वैद्यकीय सुविधा व शासनाच्या विविध सोयीसुविधा देण्यात याव्या 
3)कामगारांना कंपनी कायद्याप्रमाणे स्थाई कामगार म्हणून मान्यता देण्यात यावी या कंत्राटी कामगारांच्या मुख्य मागण्या घेऊन त्यांनी कंपनी गेट समोर धरणे आंदोलन करून कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

त्यांच्या या वाढदिवशी अनोखे आंदोलनात मोठ्या संख्येने कामगार व शिवसैनिक उपस्थित होते व काल दिवसभर चंद्रपूर च्या राजकीय वर्तुळात या वेगळ्या वाढदिवस-उपक्रमाची चर्चा रंगली होती.