ब्रेकिंग न्यूज : सिंदेवाही वनपरिक्षेत्रात पुन्हा पट्टेदार वाघाचा हमला : इसम जखमी - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : सिंदेवाही वनपरिक्षेत्रात पुन्हा पट्टेदार वाघाचा हमला : इसम जखमी

Share This
खबरकट्टा /चंद्रपुर :सिंदेवाही-

सिंदेवाही  वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही उपवनक्षेत्रांतर्गत येत असलेल्या पवना (चक) बिटातील कोठा(गुंजेवाही) येथील लालाजी गणू मेश्राम ( वय 54 ) हा इसम 7:30 च्या दरम्यान आपल्या शेतामध्ये खत टाकण्यासाठी गेला असताना, झुडुपात तब्बा धरुन बसलेला पट्टेदार वाघाने अचानकपणे हल्ला चढवला.

धाबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हमला करताच मी प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु निरुपाय झाला.लगेच आरडाओरड करताच तो तेथून बाजुला झाला. आरडा ओरड केल्याने वाघ माघारी फिरला तो पर्यंत वाघाने छातीवर, डाव्या हाताला व पाठीच्या मागच्या बाजूला पंजाने मारुन जखमी केले- जखमी गणू मेश्राम 

ही माहिती गावकऱ्यांना मिळताच वाघाला परतवून लावून त्या जखमी ला घेऊन गुंजेवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथे प्रथमोपचार करून सिंदेवाही येथे पाठविण्यात आले. 

यावेळी वनविभागाचे क्षेत्र सहायक कुळमेथे, वनरक्षक धात्रक मॅडम, राठोड व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी गावकऱ्यांनी मदतीचा हात देऊन त्याचा उपचार योग्य करण्यात यावा.व शासनस्तरावरून मोबदला तात्काळ देण्यात यावा अशी मागणी केली.या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाचे अधिकारी करीत आहेत.