चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन दरम्यान वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलाची अधिसूचना - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन दरम्यान वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलाची अधिसूचना

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : शहर प्रतिनिधी -

चंद्रपूर शहरातील मुख्य गणेश विसर्जन कार्यक्रम दिनांक 12/09/19 रोजी होणार असून पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी अधिसूचना निर्गमित करुन दि. 12/09/2019 चे 6:00 पासुन ते 13/09/2019चे 6:00 वा. खालील प्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.


1) सावरकर चौक ते बस स्टॅन्ड -प्रियदर्शनी चौक जेतपुरा गेट -कस्तुरबा चौक- गांधी चौक तसेच पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात आला आहे... 
2) नागपूर रोडणे येऊन बल्लारशा किंवा मुल कडे जाणारी वाहने ही प्रियदर्शनी चौकाकडे जाण्यास बंदी करण्यात आली असून त्यांनी वरोरा नाका- सावरकर चौक- बंगाली कॅम्प या मार्गाचा अवलंब करावा.

3) नागपूर कडून शहरांमध्ये जाणारी हलकी वाहने यांनी घुटकाळा- श्री टॉकीज- पठाणपुरा परिस परिसराकडे जावयाचे असल्यास जुना वरोरा नाका येथून उजवीकडे वळण घेऊन आंबेडकर कॉलेज- संत केबलराम चौक- सवारी बंगला- नगीना बाग ते चोर खिडकी मार्गे शहरात प्रवेश करावा... 

4) मूल किंवा बल्लारशा कडून नागपूर कडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बंगाली कॅम्प -सावरकर चौक- नवीन उड्डाणपूल मार्गे नागपूर कडे जातील... 

5) चंद्रपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवाशांनी नागपूर, वनी, घुगुस, गडचांदूर कडे जाण्यासाठी रहमत नगर, नगीना बाग व इतर परिसरातून जाण्यासाठी बिनबा गेट- रहमत नगर- दाताळा रोड या मार्गाचा अवलंब करावा.. 

6) बल्लारशा व मुल कडून येणारी वाहनांना शहरात जावयाचे असल्यास बस स्टॅन्ड- एलआयसी ऑफिस- बगड खिडकी मार्गे किंवा जुना चौकातून किंवा प्रसन्ना पेट्रोल पंप कडून बाबुपेठ मार्गे फक्त आंचलेस्वर गेटपर्यंत प्रवेश करता येईल. 

नो पार्किंग झोन :
1) जेटपुरा गेट ते कस्तुरबा चौक
2) जेटपुरा गेट ते रामाळा तलाव
3)जेटपुरा गेट ते दवा बाजार
4) जेटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक 
5) कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जेटपुरा गेट पर्यंत.
6) कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेट
7) गांधी चौक ते मिलन चौक ते जोड देऊळ..
8) कस्तुरबा चौक ते जेल रोड चौक
9) दस्तगीर चौक ते मिलन चौक.
10) मिलन चौक ते बजाज पॉलिटेक्निक कॉलेज
11) हिंदी सिटी हायस्कूल ते रघुवंशी कॉम्प्लेक्स
12) मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीज चौक
13) छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदिर 
ही ठिकाणे नो- पार्किंग झोन व नो- हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. वरील ठिकाणी कोणत्याही प्रकारची वाहने नागरिकांनी पार्क करू नये. 

पार्किंग झोन :
गणेशभक्तांची वाहने पार्क करता यावीत याकरिता खालील ठिकाणी पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.. 
1) चांदा क्लब ग्राउंड
2) आंबेडकर कॉलेज
3) सेंट मायकल हायस्कूल नगीनाबाग
4) सिंधी पंचायत भवन च्या बाजूला खाली असलेली जागा.
5) पठाणपुरा व्यायाम शाळा
6) महाकाली मंदिर ग्राउंड
7) डीएड कॉलेज बाबुपेठ.‌ 

वरील प्रमाणे वाहतुकीत करण्यात आलेला बदल हा दिनांक 12 सप्टेंबर 2019 चे सकाळी 6:०० वाजता पासून ते दिनांक 13 सप्टेंबर 2019 चे सकाळी 6:०० वाजेपर्यंत अंमलात राहील.. 

गणेश विसर्जन दरम्यान नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.