काँग्रेस च्या पहिल्या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील वडेट्टीवार, धानोरकर, वारजूरकर व डॉ.झाडे यांची नावे प्रस्तावित ? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

काँग्रेस च्या पहिल्या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील वडेट्टीवार, धानोरकर, वारजूरकर व डॉ.झाडे यांची नावे प्रस्तावित ?

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्षांच्या  उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास सुरूवात झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या देखील पहिल्या यादीतील नावं जवळपास निश्चित झाली आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची शुक्रवारी बैठक झाल्यानंतर आता काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीतली नावं बाहेर आली आहेत. 

यात काही मोजके अपवाद वगळता जवळपास सर्वच उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

बाळासाहेब थोरात (संगमनेर ), अशोक चव्हाण (भोकर), विजय वडेट्टीवार (ब्रम्हपूरी), डी. पी. सावंत (नांदेड), वसंत चव्हाण (नायगाव, नांदेड), अमीन पटेल (मुंबादेवी), वर्षा गायकवाड (धारावी), भाई जगताप (कुलाबा), नसीम खान (चांदीवली), यशोमती ठाकूर (तिवसा), के. सी. पडवी (अक्कलकुवा), संग्राम थोपटे ( भोर ), संजय जगताप (सासवड), वीरेंद्र जगताप (धामनगाव), सुनील केदार (सावनेर), अमित देशमुख (लातूर), बसवराज पाटील (औसा), विश्वजित कदम (भिलवडी), प्रणिती शिंदे (मध्य-सोलापूर) यांची नावे जवळपास निश्चित आहेत.

याच प्रास्तावित पहिल्या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी चार क्षेत्रातील उमेदवारांची नावे जाहीर होण्याची संभावना असून यात ब्रम्हपुरी करिता विरोधी पक्ष गटनेते आमदार विजय वडेट्टीवार, लागतच्याच चिमूर विधानसभेत सतीश वारजूरकर, वरोरा करिता  खासदार पत्नी प्रतिभा धानोरकर व  बल्लारपूर क्षेत्राकरिता वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात चंद्रपुर येथील सुप्रसिद्ध जनरल फिजिशिअन डॉ.विश्वास झाडे यांची नावे जवळपास निश्चित असून फक्त अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी असल्याचे विश्व्सनीय सूत्रांकडून कळते. 

दरम्यान, पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी काँग्रस ही यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.सोबतच जिल्ह्यातील उर्वरित चंद्रपूर व राजुरा विधानसभा क्षेत्र आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला जातात की उर्वरित यादीत येथील उमेदवार घोषित होईल हे महत्वाचे.