आश्रम शाळा देवाडा येथे बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

आश्रम शाळा देवाडा येथे बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

Share This
खेळ देते जीवन कौशल्याचे धडे - मुमताज अब्दुल जावेद उपसभापती पं. स. राजुरा  
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा ग्रामीण प्रतिनिधि-

शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवाडा येथे नुकत्याच पार पडलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत बीट स्तरीय  शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन दिनांक 16 ते 18 सप्टेंबर 2019 दरम्यान करण्यात आले होते. 


स्पर्धेचे उदघाटन दिनांक 16 सप्टेंबर ला सकाळी 11 वाजता मानानिय मुमताज अब्दुल जावेद  उपसभापती पंचायत समिती राजुरा यांचा शुभहस्ते संपन्न झाले. उदघाटन प्रसंगी मा लक्ष्मीबाई पंढरे सरपंच ग्रा. प. देवाडा, श्री अब्दुल जावेद अब्दुल मजीद उपसरपंच ग्रा. प. देवाडा व समस्त ग्राम पंचायत समिती देवाडा येथील सर्व सदस्य उपस्थित होते. वीर बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमके यांचा प्रतिमेचे पूजन, क्रीडा ध्वजारोहन, क्रीडाज्योत प्रज्वलित करून व विविध आश्रमशाळेचा पथसंचलन द्वारे क्रीडास्पर्धेची सुरुवात झाली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संजीव क्षीरसागर मुख्याध्यापक आश्रमशाळा  देवाडा यांनी केले तर सूत्रसंचलन कु पुर्वा खेरकर क्रीडा शिक्षिका व आभार अर्चना जुनघरे  आश्रमशाळा देवाडा  यांनी मानले. 

 एकूण नऊ शासकीय व अनुदान आश्रमशाळेचा 450 खेळाडू विद्यार्थी मुले व मुली स्पर्धेत सहभागी झाले होते, स्पर्धेत 14, 17 व 19 वर्ष आतील वयोगटात  मुले व मुली कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल व अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात क्रीडा कौशल्य सादर केले. खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन करीत जय पराजय  स्वीकारीत खेळाडूंनी स्पर्धेत हिरहिरीने सहभाग घेतला तसेच 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये आदिवासी नृत्य, लोक नृत्य, गितगायन व नाटक प्रस्तुत करीत आपकी कला सादर केली. स्पर्धेत विजयी खेळाडूंचे व संघाचे पुढील चंद्रपूर प्रकल्प स्तरासाठी निवड झाली आहे. 

स्पर्धेला दिनांक 18 सप्टेंबर रोजी समारोपीय कार्यक्रमात बक्षिस वितरण म्हणून श्रीमती मेघाताई नलगे जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर, डॉ. दुधाते साहेब आरोग्यधिकारी आरोग्य केंद्र देवाडा यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री एस डब्लू क्षीरसागर मुख्याध्यापक आश्रमशाळा देवाडा यांनी भूषविले. तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचा अहवाल श्री उमेश कडू क्रीडा समन्वयक प्रकल्प चंद्रपूर यांनी सादर केला. 

जास्तीत जास्त विजेती संघ व वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत विजय मिळावीत शिवाजी अनुदानीत आश्रमशाळा सुब्बई चे खेळाडू 697 गुना सह सर्वसाधारण विजेते राहिले तर एकलव्य रेसिडेन्सीयल स्कुल देवाडा उपविजेते पदाचे मानकरी ठरले. मा. मेघाताई नलगे यांचा हस्ते क्रीडाज्योत मालवून व ध्वजावतरन करून कार्यक्रमाची सांगता झाली, समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु पुर्वा खेरकर यांनी केले तर आभार अर्चना जुनघरे यांनी मानले.