जिवती तालुक्यातील रस्ते झाले खड्डेमय व चिखलमय - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिवती तालुक्यातील रस्ते झाले खड्डेमय व चिखलमय

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : जिवती -संतोष इंद्राळे 


कधी मुसळधार तर कधी रिमझिम,मात्र पावसाने कधीच उसंत घेतलेली दिसत नाही आहे,अश्या परिस्थिती मध्ये जिवती शहरातील व परिसरातील डांबरी व खडीकरणाचे रस्ते खराब झाले आहेत,तर अतिपावसमुळे व बि.एस.एन.एल च्या खोदकामामुळे जिवती पासून गावागावाला जोडणारे रस्ते सुद्धा खड्डेमय व चिखलमय झालेले दिसत आहेत.


तर शेणगाव,परमडोली,कुंभेझरीे,येसापूर, येथील तसेच परिसराच्या अनेक गावातील नागरिकांना जिवतीत कामासाठी यावे लागते,या रस्त्याची उन्हाळ्यातच दुरवस्था झाली होती पण त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले,पावसाळ्यात पावसाचे पाणी या खड्ड्यामध्ये साचत असल्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते तर अश्यातच खड्ड्याचा अंदाज येत नाही खड्यामध्ये वाहन गेल्यानंतर खड्डे विस्तारत जात आहेत.

याच खड्डेमय रस्त्यामुळे अनेकांना आपला जिव गमवावा लागला आहे, एकीकडे तालुक्यात प्रशासनाकडून विकास कामाचा व  भूमीपूजनाचा सपाटा सुरू आहे,ही कामे पूर्ण होणार की नाही पण जुन्या रस्त्याचं काय हा प्रश्न महत्वाचा आहे,तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जि.प.बांधकाम विभागाचे दुरूस्तीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे,असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.