शेतकऱ्याची कर्जाला व नापिकीला कंटाळून कीटकनाश पिऊन आत्महत्या - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकऱ्याची कर्जाला व नापिकीला कंटाळून कीटकनाश पिऊन आत्महत्या

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :संतोष इंद्राळे जिवती -

येरमी येसापूर येथील व्यंकटी मारोती घुमाडे (वय 55) या शेतकऱ्याने कर्जाला व सततच्या नापिकीला कंटाळून आपल्याच शेतात किटकनाशक पिऊन आत्महत्या केली.

सविस्तर वृत्त असे की दि.16 सप्टेंबर ला शेतात कीटकनाशक घेतल हे लक्षात आल्यावर नातेवाईकानी त्यांना जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून त्यांना जिल्याच्या ठिकाणी हलविण्यात आले होते परंतु आज त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला,त्यांच्यावर काही खाजगी सावकारी कर्ज असल्याचे समजते,त्यांच्या मागे खूप मोठा परिवार दोन मुले व एक मुलगी व म्हातारी पत्नी आहे.