उमेदवार रांगेत : मतदार प्रतीक्षेत - राजुरा करिता भाजपकडून चौथ्या इच्छुक उमेदवाराची एन्ट्री : डॉ.मंगेश गुलवाडे यांना उमेदवारी देण्याकरिता धनगर समाजाचे अहिरांना निवेदन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उमेदवार रांगेत : मतदार प्रतीक्षेत - राजुरा करिता भाजपकडून चौथ्या इच्छुक उमेदवाराची एन्ट्री : डॉ.मंगेश गुलवाडे यांना उमेदवारी देण्याकरिता धनगर समाजाचे अहिरांना निवेदन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

राजुरा विधानसभेत डॉ. गुलवाडे यांना उमेदवारी देण्याकरिता धनगर जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते  हंसराज अहिर यांना आज निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देतांना धनगर समाजाचे यशवंत कन्न्मवार ,रामकूमार अक्कापेल्लीवार, महादेव गराड, खेमदेव कन्नमवार , सुनील पोरांटे , दीनदास चामोटे ,सुरेश चामाटे ,अनिल बोधे ,जयंत खाणेकर ,सुरेश येवले आदिंचि उपस्थिति 

राजुरा विधानसभेत विद्यमान आमदार अँड. संजय धोटे सह , राजुरा विनधासभा प्रमुख खुशाल बोन्डे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे हे आधीच इच्छुक उमेदवार असतांना आता डॉ. गुलवाडे यांच्या समाजातील जातीय कार्डाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 
त्यामुळे कधीनव्हे ते पहिल्यांदा भारतीय जनता पक्षात राजुरा विधानसभेकरीता इतकी भाऊगर्दी बघायला मिळत आहे.पक्ष नेमका कोणाला हिरवी झेंडी देईल याकडे पक्षातील कार्यकर्तासहित सामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.