ब्रेकिंग न्यूज : डॉ.झाडे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेस कार्यकर्त्यानी केला प्रचंड गरदोळ : पहा विडिओ - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग न्यूज : डॉ.झाडे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेस कार्यकर्त्यानी केला प्रचंड गरदोळ : पहा विडिओ

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : पोंभुर्णा -
काल कांग्रेस कार्यालय पोंभुर्णा या ठिकाणी तेथिल पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी विधानसभेच्या उमेदवार निवडी संदर्भात बैठक ठेवली होती. या बैठकीला डाँ.विश्वास झाडे यांना कोणत्याही कार्यकर्त्यांनी  पाचारण केले नव्हते.

तरिसुद्धा डाँ.विश्वास झाडे हे पोंभुर्णा येथे आले असतांना कार्यकर्त्यांच्या रोषाला त्यांना समोर जावे लागले. पोंभुर्णा येथिल कांग्रेस कमीटीचे महत्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी सुधिर मुनगंटीवार यांना टक्कर देणारा उमेदवार पाहीजे अशी मागणी करत आहेत. 

सध्यास्तिथीत राजुभाऊ झोडे यांच्याशिवाय कोणताही ठोस उमेदवार कांग्रेसकडे दिसत नसल्याने राजुभाऊ झोडे यांनाच उमेदवारी देण्यात यावी करिता सर्वजन जमले होते. परंतु डाँ.विश्वास झाडे हे त्याठिकाणी पोचुन मलाच उमेदवारी मिळणार आहे आणि तुम्ही मला मदत करा असे आवाहन करताच कांग्रेसचे पोंभुर्णा तालुका कमीटीच्या पदाधिकार्यांनी जोरदार हंगामा करुन त्यांचा तिव्र विरोध केला व भर बैठक सोडुन सर्वजन निघुन गेले.
या बैठकीतुन निलकंठ नैताम जेष्ट-कार्यकर्ते देवाडा,
अशोक गेडाम-सामाजिक कार्यकर्ता,अतिक कुऱेशी -गटनेते कांग्रेस,जयपाल गेडाम-नगरसेवक,ओमेश्वर पद्मगिरवार माजी तालुका कांग्रेस अध्यक्ष,जितेंन्द्र चुधरी,अविकुमार वाळकेतथा अन्य पदाधिकारी बैठकीवर बहिष्कार घालत निघून गेले.