जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या कडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन : पुराव्यासहित लेखी तक्रार दाखल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या कडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन : पुराव्यासहित लेखी तक्रार दाखल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
महाराष्ट्र विधानसभेच्या निवळणुका जाहिर झाल्या असून 21 सप्टेंबर रोजी राज्यभरात आचार संहिता लागू झालेली आहे. 

मतदाराना आपल्या पक्षाकड़े आकर्षित करण्याकरीता प्रलोभन स्वरुपात वॉर्ड क्रं 01 येथे "हम करे सो कायदा" या म्हणी प्रमाणे दिनांक 23 सप्टेम्बर रोजी घुग्घुस येथील अमराई वॉर्ड क्र 01 येथे चारचाकी पिकअप वाहनात मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे तसेच जिल्हापरिषद् सदस्या सौ. नीतू विनोद चौधरी यांच्या नावाची पाटी असलेली तसेच भाजप पक्षाचे झेंड्याचा रंग असलेल्या सीमेंटचे बेंच जागोजागी लावण्यात आले.

हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे आचार संहिते मध्ये अश्या प्रकारे शासकीय कामें केल्या जात नसतानी देखील सीमेंट बेंच लावण्यात आले व विरोधा नंतर नावासमोर कागज चिपकविण्यात आले.

या प्रकाराची तक्रार घुग्घुस शहर कांग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर यांनी पुराव्यासह चंद्रपुर विधानसभा निवडणूक अधिकारी मनोहर गव्हाळ यांच्याकडे लिखीत स्वरुपात केली तसेच जिल्हाधिकारी कुणाल खैमनार तसेच तहसीलदार यांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली असून निवडणूक अधिकारी काय करवाई करतात याकडे घुग्घुस वासियांचे लक्ष लागलेले आहे.