पुन्हा एका बिबट्याच्या मृत्यू : घटनास्थळी संशयास्पद गोष्टी आढळ्याने अनैसर्गिक मृत्यूची दाट शंका - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पुन्हा एका बिबट्याच्या मृत्यू : घटनास्थळी संशयास्पद गोष्टी आढळ्याने अनैसर्गिक मृत्यूची दाट शंका

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : नागभीड प्रतिनिधी -

आज दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी ब्रह्मपुरी वन विभाग परिक्षेत्र (प्रादे.) उपक्षेत्र तळोधी क्षेत्र आलेवाही मधील नागभीड तालुक्यातील वाढोणा गावालगत  बिबट्याचा मृतदेह आढळून आला. 


असून अधिक तापसांती नर बिबट अंदाजे 3.5 ते 4 वर्षाचा असल्याचा कयास बिबट्याच्या पंजांवरुन  वनविभागाने लावला आहे.  

सदर घटना स्थळ हे वाढोणा गावाशेजारी असून बिबट्याच्या नैसर्गिक मृत्यू नसल्याचे प्राथमिक तपासात आढळले असून घटनास्थळाचा पंचनाम्यात काही संशयास्पद गोष्टी वनविभागाने टिपल्या असून आधिक तपास सुरु आहे.