महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यास अशील शिवीगाळ करणाऱ्या दोन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यास अशील शिवीगाळ करणाऱ्या दोन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : पोंभुर्णा प्रतिनिधि -

चंद्रपूर महावितरणच्या बल्लारशा उपविभागांतर्गत असलेल्या पोंभुर्णा येथील 33 केव्ही उपकेंद्रात कार्यरत महिला यंत्रचालक कुमारी वैशाली दशरथ पेंदारे यांना वीजपुरवठा खंडित झाल्याच्या कारणास्तव अश्लिल शिविगाळ करून धमकी देणा-या अमोल देवतळे व अमित भांडेकर या दोन ग्राहकाविरोधात पोंभुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोंभुर्णा भागातील वीजपुरवठा 33 केव्ही उपकेंद्रात आलेल्या काही तांत्रिक कारणास्तव खंडित झाला होता, यावेळी स्थानिक रहिवासी अमोल देवतळे व अमित भांडेकर या दोघांनी 33 केव्ही उपकेंद्रात कार्यरत यंत्रचालक कुमारी वैशाली दशरथ पेंदारे या महिला वीज कर्मचा-यास मोबाईलवर कॉल करून वीजपुरवठा त्वरीत सुरु करा अन्यथा बघून घेण्याची घमकी देत अश्लिल शब्दात शिविगाळ केली. याप्ररकरणी स्थानिक पोंभूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलीसांनी या भारतीय दंड संहितेच्या कलम 504 व 507 अन्वये दोघांविरोधात शासकीय कर्मचा-यास धमकी व अश्लिल शिविगाळ केल्याप्रकरणी सार्वजनिक शांतता भंग करण्यासाठी जाणीवपुर्वक अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.